Take a fresh look at your lifestyle.

Petrol-Diesel, LPG Price Today : डिझेल तब्बल 25 रुपयांनी तर पेट्रोल ही महागलं, LPG सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ…

0

शेतीशिवार टीम : 22 मार्च 2022 : मंगळवारचा दिवस सर्वसामान्यांसाठी दिलासा नाही तर तडाखा घेऊन आला आहे. घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरपासून ते पेट्रोल आणि डिझेल आजपासून महाग झाले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून नवीन दरानुसार 22 मार्चपासून म्हणजेच आजपासून पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 80 ते 80 पैशांनी महागलं आहे.

यापूर्वी घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, आजही पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त डिझेल 77.83 रुपये आणि सर्वात स्वस्त पेट्रोल 83.63 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

भोपाळ, जयपूर, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे आहे. मुंबईत पेट्रोल आता 110.82 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95 रुपयांवर पोहचलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 136 दिवसांनंतर तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. दिल्लीतील पेट्रोल पंपांवर डिझेल 87.47 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीतील पेट्रोल स्टेशनवर पेट्रोलची किंमत 96.21 रुपये प्रति लीटर आहे तर घाऊक किंवा औद्योगिक ग्राहकांसाठी त्याची किंमत प्रति लिटर 115 रुपये झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही. मात्र, या काळात जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे.

LPG सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ…

आजपासून घरगुती LPG सिलिंडरचे दर तब्बल 50 रुपयांनी महागले आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील निवडणुकांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून एलपीजी (LPG) सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिलासा मिळत होता. 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आले होते.

आजपासून म्हणजेच 22 मार्च 2022 पासून दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 949.5 रुपयांवर गेली आहे. पूर्वी ते 899.50 रुपये होती. जर आपण कोलकात्याबद्दल बोललो, तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 926 रुपये होती, ती आजपासून 976 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे लखनऊमध्ये किंमत 938 रुपयांवरून 987.5 रुपये झाली आहे. पाटण्यात ते 998 रुपयांवरून 1039.5 रुपयांवर पोहोचले आहे.

आपल्या मुंबईबद्दल बोलायचं झालं तर, मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 899.5 रुपये होती, ती आता 949.5 रुपयांवर पोहचली आहे.

6 ऑक्टोबर 2021 नंतर 21 मार्च 2022 पर्यंत घरगुती LPG सिलेंडर स्वस्त किंवा महाग नव्हते. मात्र, या काळात कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 140 डॉलरचा टप्पा ओलांडला होता. मात्र, या काळात कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय बदल झाला.

ऑक्टोबर 2021 ते 1 मार्च 2022 दरम्यान कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत 275 रुपयांनी वाढ झाली आहे, तर 1 मार्च 2021 ते 2022 दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत केवळ 81 रुपयांनी वाढली आहे. आता घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.