शेतीशिवार टीम : 21 मार्च 2022 : भारतातील सर्वात स्वस्त MPV बद्दल बोलायच म्हटलं तर Renault Triber चे नाव पहिले येतं. ही एक उत्तम अशी फॅमिली कार आहे. यामध्ये कुटुंबीय किंवा मित्रमंडळी एकत्र ट्रॅव्हल करू शकतात, कारण यामध्ये तुम्हाला 7 सीट मिळतात. या कारमध्ये एकाच वेळी एक मोठे कुटुंब देखील बसू शकते.
Renault Triber भारतात मिळणारी काही हॅचबॅक कार्सपेक्षा अधिक परवडणारी हि कार, तसेच सर्वसामान्यांसाठी ही अतिशय परवडणारी फॅमिली कार आहे. Renault Triber MPV देशातील 1 लाख लोकांनी खरेदी केली आहे. तुम्हीही ही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 18-19 km/l चा मायलेजही पाहायला मिळतो.
किंमत :-
सर्वप्रथम, जर आपण या कारच्या किंमतीबद्दल बोललो तर, त्याच्या बेस मॉडेल रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber) RXE ची स्टार्टींग प्राईस 5,69,000 रुपये याशिवाय (Ex-showroom) आहे. त्याच वेळी, त्याच्या टॉप मॉडेल RXZ EASY-R ड्युअलटोनची किंमत 8,25,000 रुपये (Ex-showroom) आहे.
सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक :-
या कारच्या सुरक्षेच्या फीचर्स बद्दल बोलायच म्हटलं तर, रेनॉल्ट ट्रायबरला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये एडल्ट ऑक्यूपेंट (वृद्ध प्रवासी) साठी 4 स्टार आणि लहान मुलांच्या सुरखतेसाठी 3 स्टार देण्यात आले आहे. याचा अर्थ रेनॉल्ट ट्रायबर फक्त स्पेसियस आणि आर्थिकदृष्ट्याच नाही तर भारतीय बाजारपेठेतील सर्वात सुरक्षित वाहनांपैकी एक आहे.
कसं आहे इंजिन ?
त्याच्या इंजिनबद्दल जाणून घ्या, Renault Triber मध्ये 999cc 3 – सिलेंडर इंजिन आहे, जे 6250 Rpm वर 71 Hp पॉवर आणि 3500 Rpm वर 96 Nm टॉर्क जनरेट करते. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल झाले तर ट्रायबरच्या समोर डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक आहे. सस्पेन्शनच्या बाबतीत, ट्रायबरला पुढील बाजूस लोअर ट्रँगल आणि कॉइल स्प्रिंग आणि मागील बाजूस टॉर्शन बीम एक्सल सस्पेंशनसह मॅकफर्सन स्ट्रटन सस्पेंशन मिळते.

40 लिटर फ्युएल टॅंक कॅपेसिटी :-
डाइमेंशनच्या बाबतीत, ट्रायबरची लांबी 3990 मिमी, रुंदी 1739 मिमी, पुढील ट्रॅक 1547 मिमी, मागील ट्रॅक 1545 मिमी, उंची 1643 मिमी, व्हीलबेस 2636 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 18 फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, ट्रायबरमध्ये 8 – इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेकेंड एंड थर्ड रो सीटसाठी एसी व्हेंट्स आणि सुरक्षिततेसाठी एअरबॅग्ज यांसारखी दमदार फीचर्स आहेत.