खुशखबर ! ‘या’ जिल्हा बँकेच्या 26,223 शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रु. जमा ; यादीही झाली अपलोड, पहा, तुम्हाला अजून का मिळाला नाही हप्ता ?

0

शेतीशिवार टीम : 17 सप्टेंबर 2022 :- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना : 2019 अंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या विविध शाखांमधील 26 हजार 223 खातेदारांची माहिती पोर्टलवर www.jalnadccbank.com अपलोड करण्यात आली आहे. छाननी अंती पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी देण्यात आल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदानाचा मुद्दा मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर होता.

दरम्यान, मंत्रीमंडळाने काही दिसवांपूर्वी प्रोत्साहन अनुदानास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांना त्यांच्याकडील प्रोत्साहन अनुदानास प्रात्र शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यामध्ये जालना जिल्हा सहकारी बँकेने आघाडी घेत 26 हजार 223 शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली आहे. अन्य बँकांकडून या कामास अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले .

दरम्यान, योनअंतर्गत 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधीत गृहित धरण्यात आला होता. 2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास आणि 2018 -19 वर्षांतील अल्पमुदतीचे पीककर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास तसेच 2019-20 या वर्षातील अल्पमुदतीचे पीककर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत परतफेड केलेले असल्यास 2019-20 या वर्षातील अल्पमुदतीच्या रकमेवर 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

अल्पमुदत पीककर्जाची रक्कम 50 हजार रुपयांपेखा कमी असल्यास शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानास पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश सर्व बँकांना देण्यात आले आहेत.

जिल्हा सहकारी बँकेचे अनुदान पात्र लाभार्थी

तालुका पात्र :-  शेतकरी 
अंबड    :-     1030
बदनापूर :-   2307
भोकरदन :-  8041
घनसावंगी :-  2531
जाफ्राबाद :-  4047
जालना :-  481
मंठा  :- 3047
परतूर :-  3838

एकूण :- 26223 पात्र शेतकरी… 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 26 हजार 223 शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत. लवकरच विशिष्ट क्रमांकासह आधार प्रमाणिकरण पूर्ण झाल्यानंतर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.

पी . बी . वरखडे , प्रभारी जिल्हा उपनिबंधक , जालना

तर शेतकरी मित्रांनो, या लाभार्थी याद्या राष्ट्रीय बँक, जिल्हा बँक, सोसायट्यांकडे जमा झाल्या आहेत. बँकेत जाऊन तुम्ही त्या याद्या पाहू शकता, परंतु निधी वितरित करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार E-KYC केली आहे का ? तसेच कोरोनाकाळात ज्या शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहे, त्यांचा खरा वारसदार कोण ? हे काही प्रश्न प्रलंबित असल्याने या बँकांना अनुदान खात्यात जमा करण्यास उशीर झाला आहे.

परंतु जे पात्र शेतकरी आहेत अन् त्यांचे बँक खात्याशी आधार E-KYC व्हेरिफिकेशन झालं आहे, त्यांच्या खात्यावर सोमवारपासून म्हणजे 19 सप्टेंबरपासून खात्यावर क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या मॅनेजरशी संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.