शेतीशिवार टीम : 17 सप्टेंबर 2022 :- फेस्टिव सीजन सध्या तर सुरुवातच झाली आहे, आणि अशा परिस्थितीत आगामी दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त घेऊन बऱ्याच लोकांनी आपल्या आवडत्या गाड्यांचे बुकिंग सुरू केलं आहे. पण अलीकडेच देशांतर्गत मार्केट मध्ये लॉन्च झालेल्या 7-सीटर एसयूव्ही ( SUV) ने तिच्या प्रचंड मागणीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

परिस्थिती अशी आहे की, जर तुम्ही या महिन्यात ही SUV बुक केली तर तुम्हाला थेट तुमच्या वाहनाची डिलिव्हरी पूर्ण दोन वर्षांनी म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये मिळेल असं सांगितलं जातं आहे, पण आम्ही नवीन Mahindra Scorpio-N बद्दल बोलत आहोत, या SUV ने बाजारात येताच खळबळ माजवली आहे आणि लोक तिची झपाट्याने बुकिंग करत आहेत.

नवीन Mahindra Scorpio-N ला खरेदीदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जेव्हा कंपनीने बुकिंग सुरू केलं तेव्हा पहिल्या 25,000 युनिट्सचे बुकिंग फक्त एका मिनिटात झालं आणि 1 लाख युनिट्सच्या बुकिंगची नोंदणी करण्यासाठी फक्त 1 तास लागला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या वर्षाच्या अखेरीस सुमारे 25,000 युनिट्स वितरित करण्याची योजना आखली आहे.

केवळ Scorpio-N च नाही तर महिंद्रा XUV700 चा व्हेटिंग पीरियड देखील जवळपास 2 वर्षांचा आहे. SUV ची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी सतत प्रयत्नशील असते, कारण महिंद्रालाही सेमी कंडक्टरच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. मात्र, चिपच्या कमतरतेची समस्या हळूहळू कमी होत असून कंपनीला प्रॉडडक्शन वाढवण्याची गरज आहे.

Mahindra Scorpio-N ला कंपनीने पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे आणि बाजारात लॉन्च केली आहे. Scorpio-N ची लांबी 4,662mm, रुंदी 1,917 mm आणि उंची 1,870 mm आहे. या SUV मध्ये तुम्हाला 2,750mm चा व्हीलबेस आणि 187mm चा ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. कंपनीने ही SUV दोन इंजिन ऑप्शन्स सह लॉन्च केली आहे.

त्याच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये, कंपनीने 2.0 लिटर क्षमतेचे mStallio टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन युज केलं आहे, जे 200PS ची स्त्राँग पॉवर आणि 370Nm टॉर्क जनरेट करते. तर डिझेल व्हेरियंटमध्ये 2.2 लीटर क्षमतेचे mHawk टर्बो-डिझेल इंजिन आहे, जे 130PS पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते.

या SUV मध्ये AdrenoX यूजर इंटरफेससह अशी अनेक फिचर्स आहेत, जी तुम्हाला पहिल्या Mahindra XUV700 मध्ये पाहायला मिळाली. नवीन Scorpio-N मध्ये Sony ची 3D साउंड सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, Apple CarPlay आणि Android Auto सह टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, एकाधिक ड्राइव्ह मोड्स, 6 एअरबॅग्ज, रूफ-माउंटेड स्पीकरसह जबरदस्त फीचर्स दिले गेले आहे. त्याची किंमत 11.99 लाख ते 23.90 लाख रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *