शेतीशिवार टीम : 17 सप्टेंबर 2022 : Electric Car च्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे, देशातील सर्वात मोठी ऑटोमेकर टाटा मोटर्स (TATA Motors) आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ही इलेक्ट्रिक कार 28 सप्टेंबरला लाँच करणार आहे. देशांतर्गत मार्केट मध्ये टाटा मोटर्सचे (Tata Motors) हे तिसरे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च होणार आहे.

याआधी कंपनीने नेक्सॉन ईव्ही (Nexon EV) आणि टिगोर ईव्ही (Tigor EV) मार्केट मध्ये आणले आहेत, जे त्यांच्या सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट मानले गेले आहेत. या कारच्या डिटेल्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झाली नसली तरी, असं मानलं जात आहे की, ही नियमित पेट्रोल (ICE) मॉडेलपेक्षा वेगळी असून आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने नवीन Tiago EV कारमध्ये सध्याच्या टिगोर इलेक्ट्रिक सेडान (sedan) पेक्षा लहान बॅटरी पॅक देऊ शकते. टिगोर (Tigor) इलेक्ट्रिकमध्ये, कंपनी 26kWh कॅपिसिटीची बॅटरी पॅक देते. Tiago EV मध्ये 26kWh बॅटरी आणि 74 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असण्याची शक्यता आहे. जी 306Km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.

असं मानलं जात की, टियागो (Tiago) इलेक्ट्रिक एका चार्जवर 310km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. याशिवाय, इलेक्ट्रिक वाहन म्हणून कंपनी त्याच्या एक्सटीरियर आणि इंटीरियर पार्ट मध्ये आवश्यक बदल करू शकते.

विशेष म्हणजे, टाटा मोटर्सचे पुढील पाच वर्षांत 10 इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च करण्याचे टार्गेट केलं आहे, ज्यामध्ये बॉडी टाइप आणि सेगमेंट समाविष्ट असतील. सध्या तर, Tata Motors ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक फोर व्हीलर कंपनी आहे, Tata Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीचे म्हणणं आहे की, ती कंम्फर्टेबल प्रवास, सायलेंट केबिन आणि लो-कॉस्ट इलेक्ट्रिक वाहने तयार करत आहे, जेणेकरून इलेक्ट्रिक वाहने प्रत्येकाला उपलब्ध होतील.

अलीकडे, टाटा मोटर्सने त्यांच्या इलेक्ट्रिक व्हीकल पोर्टफोलियोची पॉवर दाखवण्यासाठी अनेक नवीन कॉन्सेप्ट मॉडेल्स लॉन्च केली आहेत, ज्यात Avinya आणि Curvv कॉन्सेप्ट चा समावेश आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्ही(SUV) आहेत आणि कंपनी त्यांच्यावर काम करत आहे, अशी अपेक्षा आहे की लवकरच त्यांचे प्रोडक्शन रेडी मॉडेल बाजारात विक्रीसाठी लॉन्च केले जातील.

Tata Motors ची न्यू Tiago EV ही कंपनीच्या EV पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल, जी सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचेल. सध्या, कंपनीने त्याची मैकेनिज्म, मोटर किंवा बॅटरी पॅकबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

किती असेल किंमत :

लाँच होण्यापूर्वी या इलेक्ट्रिक कारच्या किंमतीबद्दल काहीही सांगणे कठीण असलं तरी, याची किंमत 10 लाखांच्या आत असू शकते असं मानलं जात आहे. कंपनीने या किमतीत ही कार लॉन्च केली तर ती देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल. सध्या, टिगोर इलेक्ट्रिक ही सर्वात स्वस्त कार आहे, ज्याची किंमत 12.49 लाख ते 13.64 लाख रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *