Take a fresh look at your lifestyle.

MahaVitaran : महावितरणाकडून लाभ घेण्याचं आवाहन, फक्त 28,000 गुंतवून 25 वर्षांपर्यंत वीजबिलापासून सुटका मिळवा, पहा अर्ज प्रोसेस..

0

सौरऊर्जेच्या वापरला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासन नेहमीच विविध योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांनी सौरऊर्जेचा वापर करावा असा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. आता या कामी हातभार लावण्यासाठी महावितरणनेही यात उडी घेतली आहे. महावितरणने देखील छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा योजना आणली आहे.

या योजनेअंतर्गत महावितरणच्या ग्राहकांना छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे. सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिल देण्यापासून सुटका तर मिळेलच सोबत नेटमीटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते. असा या योजनेचा दुहेरी फायदा आहे.

महावितरणच्या अनेक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी केंद्र शासनाने नॅशनल पोर्टल फॉर सोलर रूफटॉपचे अनावरण जुलै 2022 मध्ये केले असून या पोर्टलवर ग्राहक भारतामधून कुठूनही सोलर रूफटॉपसाठी अर्ज करू शकतो.

सदर योजना ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याची असून, या योजनेमुळे रोहित्रावरचा ताणही कमी होण्यास मदत होत आहे. या योजनेला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळ, विभागीय, उपविभागीय कार्यालय तसेच एजन्सी देखील प्रयत्न करत आहेत.

या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येत आहे. रूफटॉप सौर योजनेमधून घरगुती ग्राहकांसाठी अटी व शर्तीसह 1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40% आणि 3 किलोवॅट ते 10 किलोवॅटपर्यंत 20% अनुदान देण्यात येत आहे.

तसेच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत अनुदान देण्यात येते. मात्र यामध्ये प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट या मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20% अनुदान देण्यात येते.

महावितरण रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्जाची सोय महावितरणच्या अधिकृत www. mahadiscom.in या वेबसाईटवर करण्यात आली आहे.

पहा किती येणार खर्च.. 

 

  सोलर रुफटॉप योजना : 2022

ही यंत्रणा लावण्यात आलेल्या ग्राहकाकडून नेटमीटरिंगद्वारे वर्षअखेर शिल्लक वीज प्रति युनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही मोठा आर्थिक फायदा संबंधित वीज ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर यंत्रणा उभारणीत येणारा खर्च साधारणतः 3 ते 5 वर्षांत पूर्णपणे वसूल होणार आहे.

खाली पहा, स्टेप बाय स्टेप अर्ज प्रोसेस..

इथे क्लिक करा 

प्रत्येक महिन्यातील वीज बिलात होणारी आर्थिक बचत तसेच पर्यावरणप्रेमी ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या वीजग्राहकांनी रूफटॉप सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेऊन पर्यावरण रक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरण भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी वीजग्राहकांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.