Take a fresh look at your lifestyle.

Makar Sankranti 2023 : का साजरी केली जाते मकर संक्रांती? शेतीबद्दल नेमकं काय आहे रहस्य, पहा, शुभ मुहूर्त अन् त्यामागील कथा..

0

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीचे हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे.कारण मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. महाराष्ट्र नवे तर इतर राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा दिवस भगवान सूर्यदेवांना समर्पित आहे. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. यामुळेच हिंदू धर्मात मकर संक्रांतीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यंदाच्या मकर संक्रांतीच्या तारखेबाबत सर्वांच्या मनात संभ्रम आहे. 2023 मध्ये मकर संक्रांत कधी आहे, त्याची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया. काय आहे या मागची कथा. चला तर मग जाणून घेऊया..

मकर संक्रांत कधी असते ? 14 किंवा 15 :-

गेल्या वर्षीही मकरसंक्रांती 2023 बद्दल लोकांमध्ये संभ्रम होता. यंदाही मकरसंक्रांतीबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. विशेष म्हणजे, यावेळी मकर संक्रांती 14 जानेवारीला नाही तर 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. ज्योतिषाचार्य ऋषी द्विवेदी यांनी सांगितले की हिंदू पंचांगमध्ये सूर्य 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.12 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. तर उदय 15 जानेवारीला होत आहे. म्हणूनच नवीन वर्षात 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल.

मकर संक्रांती 2023 चा शुभ मुहूर्त :-

2023 मध्ये मकर संक्रांतीची तारीख रविवार, 15 जानेवारी रोजी येत आहे.मकर संक्रांती 2023 चा शुभ मुहूर्त 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8.57 वाजता असेल.पुण्यकाल सकाळी 7.15 ते 5.46 पर्यंत असेल. दुपारी (कालावधी – 10 तास 31 मिनिटे) आणि मकर संक्रांती महा पुण्यकाल सकाळी 7:15 वाजता सुरू होईल आणि रात्री 9:00 वाजता समाप्त होईल (कालावधी – 1 तास 45 मिनिटे).

मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे :-

मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर काळ उडीद, तांदूळ आणि मूग यांची खिचडी दान करावी. असे केल्याने शनि, गुरू आणि बुध ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे.

मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली

ज्योतिषी ऋषी द्विवेदी यांनी सांगितले की,पहिल्यांदा मकर संक्रांतीची सुरुवात 14 जानेवारी 1902 रोजी झाली.18 व्या शतकात मकर संक्रांती 12 आणि 13 जानेवारीला साजरी केली जात होती.मकर संक्रांती पहिल्यांदा 15 जानेवारी 1964 मध्ये साजरी करण्यात येत आहे . यासोबतच दर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी 14 जानेवारीला आणि चौथ्या वर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो.

मकर संक्रांत का साजरी केली जाते?

मकर संक्रांती हा नूतन वर्षाचा पहिला सण असतो. देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाला भेटायला जातात, अशी धार्मिक मान्यता आहे.त्यावेळी शनी मकर राशीचे प्रतिनिधीत्व करतो. पिता सूर्य आणि पुत्र शनी यांच्यातील परस्पर मतभेद दूर करण्यासाठी, या दिवशी तो शनी राशीत मकर राशीत प्रवेश करतो. तेव्हापासून मकर संक्रांत साजरी केली जाते.

काय आहे मकर संक्रांतीची कथा :-

मकर संक्रांतीची कथा शनिदेव आणि सूर्यदेव यांच्याशी संबंधित आहे. असे मानले जाते की, पिता सूर्यदेव आणि पुत्र शनिदेव यांचे संबंध चांगले नव्हते. सूर्य आणि शनि एकमेकांशी भेटलेले नव्हते. एके दिवशी जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा आपल्या मुलाला म्हणजे शनिदेवाला भेटायला गेले होते. त्यावेळी शनिदेवाने आपल्या वडिलांना काळे तीळ भेट दिले होते आणि त्याच तीळाने त्यांची पूजाही केली होती. त्यामुळे पिता सूर्य प्रसन्न झाला अन् त्यावेळी सूर्याने पुत्र शनीला आशीर्वाद दिला की, जेव्हा तो मकर राशीत आपल्या घरी येईल तेव्हा त्याचे घर धनाने भरून जाईल..

Leave A Reply

Your email address will not be published.