शेतीशिवार टीम, 3 फेब्रुवारी 2022 : Tata Nexon EV ला टक्कर देण्यासाठी Mahindra आपली पहिली इलेक्ट्रिक SUV कार लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्हीची रोड-टेस्टिंग सुरू केली आहे. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. महिंद्राची ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही XUV300 पेट्रोल आणि डिझेल कारच्या उपस्थित मॉडेलवर आधारित असणार आहे.
टेस्ट होत असलेल्या इलेक्ट्रिक कारचे नाव XUV400 EV असं असण्याची शक्यता आहे. ही कार महिंद्रा SUV कार टाटा मोटर्सच्या नेक्सॉनला (Nexon EV) ला टक्कर देईल. या व्यतिरिक्त, ती कार MG Motor ZS EV सोबत सेगमेंटमध्येही स्पर्धा करू शकते, जी या महिन्यात फेसलिफ्ट व्हर्जनसह मार्केटमध्ये येणार आहे.
ऑटोकार इंडियाच्या (Autocar India) रिपोर्टनुसार, कारच्या डाव्या फेंडरवर चार्जिंग सॉकेट तपासले आहे, ज्यामुळे ती इलेक्ट्रिक कार असल्याची साक्ष्य होते. Mahindra e-XUV400 ला 350 ते 380 दरम्यान बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे जर महिंद्राने या कारमध्ये असा बॅटरी पॅक आणला, तर तिची थेट स्पर्धा Nexon EV सोबत होईल ज्यात एक समान बॅटरी पॅक आहे.
पेट्रोल डिझेलच्या या महागाईत इंधनाचा पर्याय देण्यासाठी महिंद्राने असे इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणण्याची योजना आखली आहे. 2027 पर्यंत 8 इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. आत्तापर्यंत, महिंद्राकडे इलेक्ट्रिक ट्रिममधील कार नाही, परंतु थ्री-व्हीलर कॅटेगरी त्यांची EV व्हीकल आहे.
महिंद्राच्या या इलेक्ट्रिक SUV ची रोड-टेस्टिंग सुरू झाली असले तरी तिचे प्रॉडक्शन आणि रोल आउट व्हायला वेळ लागणार आहे. आता ही महिंद्राची EV व्हीकल कधी बाजारात येणार हे पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे. आता MG Motor ने ही या दिशेने पाऊल ठेवलं आहे. MG Motor 2022-23 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणण्याची योजना आखली आहे.