कोटा (राजस्थान) येथील 21 वर्षीय यशराज साहू आणि त्याचा 24 वर्षीय जोडीदार राहुल मीणा या जोडीने मातीचा वापर न करता लटकलेल्या पिशव्यांद्वारे ऑयस्टर मशरूमच्या (Oyster mushrooms) लागवडीतून अवघ्या 45 – 60 दिवसांत चांगला नफा कमावला. यासाठी त्यांना जास्त पैसेही खर्च करावे लागले नाहीत आणि आता ते MSVO Agro Steps Pvt Ltd मध्ये सामील होत असून स्वत:ची कंपनी सुरू करून लोकांकडून मशरूम खरेदी करत आहेत, तेही बाजारभावापेक्षा जास्त दराने जेणेकरून ते अधिका – धिक लोकांना मशरूमच्या लागवडीशी जोडू शकेल…

यशने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे. 625 चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत मशरूम लागवडीसाठी रचना तयार करण्यासाठी बांबू, हिरवी जाळी, काळी पॉलिथिन आदी सर्व कामे त्यांनी स्वत: केली. रचना तयार झाल्यानंतर त्यांनी सलग दहा दिवस रात्री 9 ते 1 वाजेपर्यंत 500 पिशव्या तयार केल्या, ज्यामध्ये मशरूमची लागवड करता येईल. आता यशने मशरूम लागवडीच्या 500 पिशव्यांपेक्षा 1000 पिशव्यांपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची तयारी ही सुरू आहे.

शाळेतच ठरवला होता हा मशरूम शेतीचा मार्ग :-

गरीब कुटुंबातील यशराजचे ध्येय शाळा शिकत असतानाचं ठरलेलं होतं. शालेय शिक्षणादरम्यान त्यांनी मशरूम व्यवसायात आपले भविष्य ठरवलं आणि इयत्ता 11वी मध्ये कृषी विषय निवडून शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर पदवीसाठी B.Sc ॲग्रिकल्चरला प्रवेश घेतला.

सध्या तो B.Sc Agriculture (B.Sc. Ag) च्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. B.Sc चे शिक्षण घेत असताना त्याने ‘कृषी वन, डेहराडून’ नावाच्या संस्थेतून 1 महिना मशरूम लागवडीच्या बारकावे शिकून घेतले आणि त्यानंतर 2018 मध्ये 50 पोत्यांमध्ये मशरूम वाढवण्याचा प्रयोग केला, ज्यामुळे त्याला 80 किलोग्रॅम मशरूम मिळालं.

प्रयोगातून मिळालेले 80 किलो मशरूम त्याने 100 रुपये किलो दराने विकले. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला, पण पुढची 2 वर्षे कोरोनामुळे त्यांना त्यात विशेष काही करता आले नाही. यादरम्यान त्यांने ‘कृषी विज्ञान केंद्र, कोटा’च्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधून जानेवारी 2022 मध्ये नवीन तंत्रज्ञानाने मशरूम वाढवण्यासाठी 500 पिशव्या तयार केल्या आणि यावेळी त्याला 1000 किलोपेक्षा जास्त मशरूम मिळालं. खर्च वजा करूनही यशने हे ऑयस्टर मशरूम बाजारात विकून 80,000 रुपयांहून अधिक कमाई केली.

केवळ ऑयस्टर मशरूमच नाही तर मशरूम पावडरमधूनही कमावतोय नफा….

यश ताज्या ऑयस्टर मशरूमची 100-150 रुपये प्रति किलो दराने विक्री करतो, त्याच मशरूमची कोरडी पावडर बनवून ती 1500-2000 रुपये प्रति किलो दराने विकतो. 100 किलो ताज्या मशरूमपासून 10 किलो मशरूम पावडर तयार केली जाते. अशा प्रकारे, यश 45-60 दिवसांच्या मशरूमच्या लागवडीतून 80,000 ते 1 लाख रुपये कमावत आहे.

यश चं म्हणणं पाहूया, “मी शालेय जीवनापासूनच मशरूमची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता, म्हणून तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर, 3 वर्षांपूर्वी मी 250 स्क्वेअर फूट मोकळ्या जागेवर स्ट्रक्चर तयार करून 50 बॅग मशरूम लागवडीचा प्रयोग सुरू केला. ज्यामध्ये अपेक्षेप्रमाणे रिझल्ट मिळाला.

यावर्षी जानेवारीमध्ये राहुल मीणा यांच्या मदतीने ऑयस्टर मशरूमच्या 500 बॅग तयार केल्या, त्यामुळे चांगले पीक बनवता आलं. सरासरी, एका घडातून 300-400 ग्रॅम ऑयस्टर मशरूम मिळतात, परंतु माझ्या पिशवीच्या गुच्छांमधून 700 ग्रॅम मशरूम तयार झालं..

कुटुंबात कोणी व्यापारी किंवा शेतकरी नाही, त्यामुळे सुरुवातीला थोडी घबराट होती. मात्र आता दीड-दोन महिन्यांच्या मेहनतीतून चांगली कमाई झाल्याने कुटुंबीयही खूश झालं आहे.आता भविष्यात तो मोठ्या प्रमाणावर मशरूम उत्पन्न करायचं ठरवलं आहे…

मशरूम पिकासाठी आवश्यक गोष्टी अन् लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी…

यश म्हणाला की ‘1000 किलो ऑयस्टर मशरूमसाठी 500 बॅग तयार कराव्या लागतात, ज्यासाठी 600 किलो स्ट्रॉ, 100 किलो बियाणे, 200 रुपयांचे ब्लॅक पॉलिथीन आणि 800 रुपयांची दोरी लागते. बांबूची रचना करून ती हिरव्या जाळ्यांनी झाकली जाते.

‘मशरूमच्या पिशव्या 18 दिवस सूर्यप्रकाशापासून पूर्णपणे दूर ठेवाव्या लागतात आणि त्यानंतर हलके पाणी शिंपडता येतं. अशा प्रकारे सुमारे 45-60 दिवसात पीक तयार होतं. एका वर्षात ऑयस्टर मशरूमची 6 ते 7 पिके लावता येतात.

यापूर्वी यशला मशरूम विकण्यात अडचणी येत होत्या, मात्र आता यूट्यूब, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी वन संस्थेच्या मदतीने त्याच्या मशरूमला चांगली मागणी आहे. त्यामुळे त्याने आता स्वतःची कंपनी सुरू केली आहे. याशिवाय यश ने आता येथे प्लांट लावण्याचे कामही सुरु केलं आहे.

लोक जे काही उत्पादित केले जाते ते बाजारभावापेक्षा जास्त किमतीला विकत घेतात आणि मागणीनुसार पुढे विकतात. पापड, कॅप्सूल आणि बिस्किटांच्या रूपात ताजे मशरूम लोणचे आणि मशरूम पावडर विकून यश देखील चांगला नफा कमवत आहे.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *