म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ठाणे, कल्याण, पालघर, रायगड आणि रत्नागिरीतील 4640 सदनिकांची आणि 14 भूखंडांची कॉम्प्युटरराईज लॉटरी काढण्यात आली. या सोडतीचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
कोकण मंडळाच्या या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांचा समावेश होता. यामध्ये 8 मार्चपासून नोंदणी आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती. 4640 सदनिकांसाठी एकूण 49 हजार 174 अर्ज पात्र ठरले होते.
त्यानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी 351 अर्ज, 20 टक्के सर्वसमावेश योजनेसाठी 46 हजार 16 अर्ज, म्हाडाच्या घरांसाठी 2 हजार 438 अर्ज आणि प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी 369 अर्ज पात्र ठरले आहेत.
आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडाची सोडत जाहीर झाली. लॉटरीत समाविष्ट एका घरासाठी म्हाडाकडे 12 लोकांनी जास्त अर्ज आले होते, यावरून लोकांच्या पसंतीचा अंदाज लावला जाऊ शकतो.
कोकण बोर्ड हाउसिंग लॉटरी 2023 चे निकाल पाहण्यासाठी :-
अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी सोडतीत प्रधानमंत्री आवासयोजनेअंतर्गत खोणी – कल्याण, शिरढोण, विरार – बोळिंज वगोठेघर येथील योजनेतील एकूण 984 सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेला केंद्र शासनाची मंजुरी असून योजनेमधील सर्व सदनिकांना केंद्र शासनाचे 1.50 लाख व राज्य शासनाचे 1 लाख अनुदान मिळणार आहे.