तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA/DR) वाढ करू शकते. 27 मार्च रोजी सरकारने 1 जानेवारीपासून डीए लागू करण्याचा निर्णय घेतला होता. 1 जानेवारीपासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 4 टक्के डीए मिळण्यास सुरुवात झाली आहे. आता पुढील महागाई भत्ता 1 जुलैपासून लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैमध्ये मोठी खुशखबर मिळणार आहे. जुलैमध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होणार असून पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पण, त्याचा आनंद एवढ्यापुरताच मर्यादित नाही तर महागाई भत्त्यात वाढ झाल्याने इतर भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे.

जुलै 2023 पासून त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांपासून निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे. यात प्रवास भत्ता (TA) आणि शहर भत्ता (CA) यांचाही समावेश आहे. याशिवाय केंद्रीय कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्येही मोठी वाढ होणार आहे.

प्रवास भत्ता (TA) मध्ये होणार वाढ..

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. म्हणजे त्यात 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या डीएचा परिणाम टीए अर्थात प्रवास भत्त्यावरही होणार आहे. जेव्हा DA 46 टक्के असेल तेव्हा TA मध्ये देखील थेट वाढ होणार आहे.

भविष्य निर्वाह निधीची व्याप्ती वाढणार..

तज्ज्ञांच्या मते, केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही सेवानिवृत्तीचे फायदे मिळत आहेत. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे त्यांचा पगार वाढणार असून मासिक भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. हे दोन्ही घटक बेसिक + डीए वरून मोजले जातात. डीए वाढला तर पीएफ, ग्रॅच्युइटीही वाढेल. यामध्ये मासिक पीएफ, ग्रॅच्युइटी योगदान वाढणार आहे.

कर्मचार्‍यांसोबत पेन्शनर्सनाही मिळणार फायदा..

केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या पेन्शनधारकांच्या महागाई सवलत (DR) देखील वाढणार आहे. हे DA सोबतच लिंक आहे. निवृत्तीनंतर, ते महागाई डियरनेस रिलीफ म्हणूनच मिळते. DR देखील 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. त्याचे मासिक पेन्शन वाढणार आहे.

जुलैमध्ये महागाई भत्त्यात होणार प्रचंड वाढ

डीएमध्ये पुढील वाढ केवळ जुलै 2023 पासून लागू होईल. म्हणजे जून 2023 पर्यंतचा महागाई भत्ता जुलैपासून लागू होईल. डीएमध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यासह तो 46 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *