मुंबई-ठाणे-नवी मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर ! आता ठाणे – बेलापूरऐवजी थेट खारघरमार्गे प्रवास, पहा असा आहे MSRDC चा 2195 कोटींचा प्लॅन..
सायन – पनवेल महामार्गावर वाहतुकीची समस्या जटिल बनली आहे. अनेकदा या मार्गावर अपघातांचे प्रसंगही घडतात. सायन – पनवेल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खारघर – तुर्भे लिंक रोडचा प्रस्ताव एमएसआरडीसीने तयार केला आहे.
या प्रकल्पासाठी 2,195 कोटी खर्च येणार आहे. या लिंक रोडमुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाहनचालकांना सायन – पनवेल महामार्गावरील ठाणे – बेलापूरऐवजी खारघरमार्गे प्रवास करता येणार असून वेळेची बचत होणार आहे.
सायन – पनवेल महामार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. यात दुचाकीचालकांचे बळी जाण्याची घटना अधिक असल्याने या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात वळवण्यात यावी म्हणून रस्ते विकास महामंडळाने तुर्भे औद्योगिक वसाहत ते खारघर हा सहा किलोमीटर लांबीचा पारसिक डोंगरातून लिंक रोड तयार करण्याचा प्रस्ताव तयार कला आहे.
हा लिंक रोड खारघरमधील सिडकोच्या कॉर्पोरेट पार्कला जाडण्यात येणार आहे. बेलापूर पेंधर मेट्रो सुरु होणार आहे. अशातच तुर्भे – खारघर मार्गाचे काम सुरु झाल्यास खारघर व तळोजा परिसरातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
या प्रकल्पामुळ खारघर, तळोजा परिसरातील घरांना अधिक मागणी येणार असल्याचे बांधकाम व्यावसायकाच म्हणणे आहे. तर, लिंक रोडमुळे खारघर परिसरात काही बाहेरील देशांतील शैक्षणिक संस्थानी जागा घेतल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने खारघर शहराचा विकास अधिक झपाट्याने होणार आहे.
कोट्यवधींच्या निधीची तरतूद..
सहा किलोमीटर लांबीच्या या लिंक रोडसाठी 2,195 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी सिडकोने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद केली असून पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
जुईनगर स्थानकासमोरील हर्डलिया कंपनीकडून खारचर टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे सिडकोच्या खारघरमधील सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स आणि फुटबॉल मैदानाचे महत्व वाढणार आहे. तसेच नवी मुंबईला थेट जगाशी जोडणाऱ्या अंतरराष्ट्रीय विमानतळासाठी साठी देखील हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर हा नवी मुंबईचा लौकिक वृद्धिंगत होण्यासाठी सिडको सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून तुर्भे – खारघर लिंक रोडमुळे शहरातील दळणवळणाच्या सुविधांना अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न आहे.
डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको