महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्च महिन्यापासून काढण्यात येणाऱ्या घरांच्या सोडतीला मे महिन्याचा मुहूर्त मिळाला आहे. एप्रिलच्या शेवटच्या किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 3 हजार 800 किंवा त्याहून अधिक घरांच्या सोडतीसाठी मुंबई मंडळाकडून जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
म्हाडाने पहिल्यांदाच खासगी विकासकांना टक्कर देत मध्यम उत्पन्न गटासाठी 35 मजली इमारतींची उभारणी केली आहे. जानेवारी महिन्यातच म्हाडा मुंबई मंडळाने मार्च महिन्यात 4 हजार घरांची सोडत काढणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार पहाडी गोरेगावमधील 2 हजार 683 घरांचा समावेश सोडतीत असणार आहे. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील 2 हजार 612 घरे व अल्प उत्पन्न गटातील 1007 घरे, मध्यम गटातील 85, तर उच्च गटातील 116 घरे अशी एकूण 3820 घरे सोडतीत उपलब्ध होणार आहेत.
पहाडी गोरेगावसह वडाळा अँण्टॉप हिल, कन्नमवार नगर, गायकवाड नगर मालाड, चारकोप, विक्रोळी, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द येथील घरांचा समावेश असणार आहे.
जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आणखी काही घरांची भर पडणार असून मुंबई करांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच नोंदणी प्रक्रियेनुसारच सोडत पार पडणार असल्याने सर्वसामान्यांनी आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून ठेवावी, असेही आश्वासन देण्यात आले आहे.
25 ते 45 लाखांत मिळणार घरे..
मुंबईतील तयार घरांची किंमत म्हाडाने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नसली तरी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, EWS घरांच्या किमती जवळपास 25 लाख रुपये आणि LIG घरांच्या किमती 45 लाखांच्या आसपास ठेवणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
वर्ग | फ्लॅट | निवासी घराची किंमत |
(EWS) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 63 |
20 लाखांपेक्षा कमी
|
(LIG) 20 लाख से कम | 126 | 20 लाख -30 लाख रु |
(MIG) मध्यम उत्पन्न गट | 201 | 35 लाख -60 लाख रु |
(HIG ) उच्च उत्पन्न गट | 194 | 60 लाख रुपये से 1.8 करोड़ रु। |
म्हाडा लॉटरीची ऑनलाइन नोंदणी कशी करावी ?
म्हाडा लॉटरी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी, अर्जदाराने महाराष्ट्र गृहनिर्माण विकास क्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटवर प्रवेश केला पाहिजे.
व्हेबसाइट :- lottery.mhada.gov.in
वेबसाइट एंटर केल्यानंतर, होम पेजवर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.
पुढील पृष्ठावर तुम्हाला अर्जदार नोंदणी फॉर्म मिळेल. नोंदणी, लॉटरी अर्ज आणि पेमेंट यासारख्या 3 पायऱ्यांमधून तुम्हाला फॉर्म भरावा लागेल
तुम्हाला नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट करावी लागेल. सर्व तपशील भरल्यानंतर मोबाईल क्रमांकावर OTP क्रमांक प्राप्त होईल.
OTP क्रमांक टाका आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.
पुढील पृष्ठावर तुम्हाला लॉटरी अर्जाचा फॉर्म मिळेल. फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील आणि फॉर्मसह विचारलेल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल आणि सबमिट वर क्लिक करा.
पुढील पृष्ठावर, तुम्हाला पेमेंट फी भरण्याशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
अशा प्रकारे म्हाडाची लॉटरी ऑनलाइन नोंदणी करण्याची तुमची पद्धत पूर्ण होईल.