म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून सोमवारपासून 4 हजार 83 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री व स्वीकृतीला सुरुवात करण्यात आली आहे. मागील 6 दिवसांत ई – नोंदणीप्रमाणेच सोडतीचे मोबाईल अँप तब्बल 70 हजारांहून अधिक मोबाइल डिव्हाईसवर डाऊनलोड करण्यात आले आहे.
आयएचएलएमएस 20 प्रणालीअंतर्गत मुंबई मंडळासाठी 12 हजार 202 अर्जदारांनी ई – नोंदणी केली असून, 5 हजार 503 अर्जदारांनी शनिवार सायंकाळपर्यंत अनामत रकमेसह अर्ज दाखल केले आहेत. अद्ययावत प्रणालीमुळे येत्या काळात विविध माध्यमातून मुंबईच्या घरांसाठी प्रतिसाद वाढेल, असा विश्वास म्हाडा अधिकाऱ्यांनी व्यक्त किला आहे.
18 जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात सोडतीचा साहळा पार पडणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून अंधेरी, जुहू , गोरेगाव , कांदिवली बारवली , विक्रोळी , घाटकोपर , पवई , ताडदेव , सायन येथील ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ सोमवारपासून करण्यात आला. संगणकीय सोडतीकरिता वापरण्यात येणारी संगणकीय आज्ञावलीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
आयएचएलएमएस 2.0 (इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम) एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली ही म्हाडाच्या संगणकीय सोडत प्रणालीचे 2.0 व्हर्जन आहे. तसेच अँण्ड्रॉईड मोबाईल फोनवर प्ले स्टोर आणि अँपल मोबाइल फोनवर स्टोरमध्ये सोडत प्रणालीचे मोबाईल अँप अँप्लिकेशन म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टिममध्ये इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे.
MHADA Mumbai Lottery 2023 : घरांच्या किंमती, अनामत रक्कम, फ्लॅटचे चटई क्षेत्रफळ, वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज प्रोसेस पाहण्यासाठी..
मागील सहा दिवसांत 12 हजार 202 अर्जदारांनी नोंदणी, तर 5 हजार 503 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज दाखल केले आहेत.
म्हाडाने यापूर्वी पुणे, औरंगाबाद, कोकण मंडळासाठी एकात्मिक संगणकीय सोडत प्रणालीचा वापर केला असून, मुंबईच्या सोडतीसाठी सध्या ई – नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत विविध मंडळाच्या माध्यमातून 65 हजार 385 अर्जदारांनी ई – नोंदणी केली असून, 1 लाख 45 हजार 464 अर्ज , तर 1 लाख 12 हजार 506 अर्जदारांनी अनामत रकमचा भरणा केल्याचे दिसून आले आहे.
सध्या मुंबई मंडळाची सोडत अर्ज विक्री व स्वाकृती प्रक्रिया सुरू असून 12 हजार 202 अर्जदारांनी अर्ज, तर 5 हजार 503 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज दाखल केले आहेत.
अत्यल्प उत्पन्न गट : एकूण 2788 सदनिका
पहाडी गोरेगाव (पश्चिम) ( पीएमएवाय ) – 1947
ॲण्टॉप हिलमधील – 417
विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील – 424
अल्प उत्पन्न गटात एकूण 1034 सदनिका
गोरेगावमधील पहाडी परिसरातील 736
उच्च उत्पन्न गटासाठी : एकूण 120
जुहू – अंधेरी (पश्चिम)
वडाळा पश्चिम
ताडदेव
लोअर परळ
शिंपोली कांदिवली
तुंगा पवई
चारकोप – कांदिवली
सायन (पूर्व)
मध्यम उत्पन्न गटासाठी : एकूण 140
उन्नतनगर गोरेगाव (पश्चिम)
महावीर नगर कांदिवली
जुहू – अंधेरी (पश्चिम)
अंधेरी ( पूर्व )
सहकार नगर चेंबूर
लोकमान्य नगर दादर
अँण्टॉप हिल – वडाळा
भायखळा
टिळकनगर चेंबूर
चांदिवली पवई
गायकवाड नगर मालाड
प्रतीक्षा नगर सायन
चारकोप – कांदिवली
उर्वरित : 298
लोकमान्य नगर दादर,
अँण्टॉप हिल – वडाळा
सिद्धार्थनगर – गोरेगाव (पश्चिम)
डी. एन. नगर अंधेरी
पंतनगर – घाटकोपर
कन्नमवार नगर – विक्रोळी
चारकोप – कांदिवली
महावीर नगर – कांदिवली
जुने मागाठाणे बोरिवली
गव्हाणपाडा मुलुंड
पीएमजीपी मानखुर्द
मालवणी – मालाड