MHADA Pune Lottery : 5863 घरांसाठी 73 हजार 848 अर्ज ! फक्त 5 लाखांत मिळतंय हक्काचं घर, आज लास्ट डेट, पहा डिटेल्स..
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 5 सप्टेंबर रोजी 5 हजार 863 घरांच्या अर्जविक्रीचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर 30 ऑक्टोबरपर्यंत जवळपास 73 हजार 848 अर्ज दाखल झाले आहेत, तर या अर्जांपैकी 51 हजार अर्जदारांनी अनामत रक्कम दाखल केली आहे.
24 नोव्हेंबर रोजी पुणे मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात दहा वाजता सोडत काढण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या 5863 सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून सुमार 73,848 अर्जदारांनी अर्ज केले असून त्यापैकी 51,000 अर्जदारांनी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.
31 ऑक्टोबर, 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत उपलब्ध राहणार असून बँकेच्या कार्यालयीन वेळेत अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.
नवीन वेळापत्रकानुसार 30 ऑक्टोबर, 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत असून 31 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 8 नोव्हेंबर, 2023 रोजी सायंकाळी 05.00 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे 8 सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 20 नोव्हेंबर, 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत..
सर्वात स्वस्त घर कोल्हापुरात..
पुणे म्हाडा लॉटरी 2023 अंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या किमती 5 लाख ते 1.11 कोटी रुपयांच्या किमतीच्या श्रेणीमध्ये उपलब्ध आहेत. म्हाडा पुणे लॉटरी अंतर्गत, 5863 घरांपैकी 2445 घरे ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ (FCFS) तत्त्वावर दिली जाणार आहे. म्हाडा पुणे लॉटरी 2023 मधील फ्लॅट 1 RK, 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK च्या कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहेत. सर्वात लहान अपार्टमेंटचे क्षेत्रफळ 204 चौरस फूट आहे आणि सर्वात मोठे 1,087 चौरस फूट क्षेत्रफळ आहे..
म्हाडा पुणे लॉटरी अंतर्गत सर्वात स्वस्त अपार्टमेंट 312 चौरस फूट क्षेत्रफळाचे आहे. त्याची किंमत 5 लाख रुपये असून, ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात आहे..