मुंबईकरांना दररोज अनेक तास वाहतूक कोंडीत घालवावे लागत आहेत. शहरांतर्गत रस्ते जुने असल्याने जागेचीही कमतरता असून लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मुंबईत नवीन रस्ता बांधण्यासाठी जमीन शिल्लक नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी मुंबईच्या सागरी किनार्यावर पर्याय म्हणून रस्ता बांधण्याचा विचार करण्यात आला.
मुंबईच्या किनारी भागाच्या पाहणीनंतर तज्ज्ञांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर मुंबईतील ‘कोस्टल रोड’ प्रोजेक्ट’चे स्वप्न सुरू झाले जे आता पूर्ण झालं आहे. यातील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वांद्रे वरळी सी – लिंकच्या वरळी टोकापर्यंत जाणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्प्याच्या प्रोजेक्टचे बांधकाम 80 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
प्रस्तावित आराखड्यानुसार, मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईचा मरीन ड्राइव्ह हा सागरी मार्गाने उत्तर मुंबईतील कांदिवलीशी जोडला जाणार आहे. मरीन ड्राइव्ह ते कांदिवली हे अंतर सुमारे 22.02 किलोमीटर आहे..
कोस्टल रोड प्रोजेक्टचे दोन टप्पे आहेत..
1. पहिला टप्पा..
मरीन ड्राइव्ह, मुंबई पासून वरळी सी लिंक 10.58 किमी..
हाजी अली ते मरिन ड्राइव्ह हा पहिला टप्पा डिसेंबर 2023, तर मे 2024 मध्ये दुसरा टप्पा सुरू करण्याचा पालिकेचा इरादा आहे. हाजी अली व महालक्ष्मी मंदिर धार्मिक स्थळांजवळ ; तसेच वरळी येथे पार्किंगची सुविधा करण्यात येत आहे.
रस्त्याची लांबी : 10.58 कि.मी.
मार्गिका संख्या : 8 (4 अधिक 4), (बोगद्यांमध्ये मार्गिका 3 अधिक 3)
पुलांची एकूण लांबी : 2. 9 कि.मी.
2. पहिला टप्पा
वरळी सी लिंक ते कांदिवली 12.04 किमी..
कोस्टल रोड बनवण्याचे काम 2018 साली झाले सुरू..
कोस्टल रोड प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याचा एकूण खर्च 12.5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कोस्टल रोडचे काम 2018 मध्ये सुरू झाले. चार वर्षांत या प्रोजेक्टचे 62 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रोजेक्ट नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. .
मुंबई कोस्टल रोडची खासियत..
मरीन ड्राइव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत समुद्रकिनाऱ्याखाली दोन किलोमीटर लांबीचे दोन समांतर बोगदे बांधले जात आहेत.
देशातील अशा प्रकारचा हा पहिला बोगदा आहे, ज्याचा व्यास 11 मीटर आहे आणि जो समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ बांधला गेला आहे.
कोस्टल रोडवर 3 इंटरचेंज आणि 4 भूमिगत पार्किंग असतील.
कोस्टल रोड हा 8 लेनचा फ्रीवे असेल..
मोनोपाइल तंत्रज्ञानाचा वापर करून एकूण 176 खांब उभारले जात आहेत.
पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शहरासाठी फुलपाखरू उद्यान, डायव्हर्सिटी पार्क तसेच 8.50 किमी लांब आणि 20 मीटर रुंद सागरी विहार बांधण्यात येणार आहे.
सायकल ट्रॅक, ओपन एअर थिएटर, 1800 वाहनांसाठी भूमिगत पार्किंगसह पर्यटकांसाठी जागाही बांधण्यात येणार आहे.
या रस्त्यासाठी 111 हेक्टर जमीन करण्यात आली संपादित..
कोस्टल रोडसाठी एकूण 111 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यापैकी 26.50 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प, 14.50 हेक्टर जमिनीवर समुद्र संरक्षण भिंत आणि 70 हेक्टर जमीन सार्वजनिक जागा निर्माण करण्यासाठी वापरली जाणार आहे.
कोस्टल रोड प्रोजेक्टचे फायदे..
मरीन ड्राइव्ह ते वरळी सी लिंक हा 50 ते 60 मिनिटांचा प्रवास सुमारे 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल.
सुमारे 34 टक्के इंधनाची बचत होणार आहे.
दक्षिण आणि पश्चिम मुंबईची कनेक्टिव्हिटी सुधारेल.
प्रदूषण कमी झाल्याने लोकांचे आरोग्य सुधारेल.
कोस्टल रोड प्रोजेक्टचा महत्त्वाचा भाग म्हणजे ‘सी वॉल’ (Sea Wall)
मुंबई हे किनारपट्टीचे शहर असल्याने अरबी समुद्रातून अनेकदा उंच लाटा उसळतात. विशेषत: पावसाळ्यात जेव्हा भरती – ओहोटी असते तेव्हा उंच लाटा उसळतात. या प्रचंड लाटांमुळे कोस्टल रोडच्या संरचनेचे नुकसान होऊ नये म्हणून किनाऱ्यावर मजबूत समुद्र भिंत बांधली जात आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे 8 मीटर उंच भिंत बांधली जात आहे..
या समुद्राच्या भिंतींच्या महत्त्वाबाबत, गुणवत्ता हमी अभियंता वसीम पटेल आणि साइट अभियंता अरविंद सोनकुसारी यांनी समुद्राच्या भिंती समुद्राच्या तटीय रस्त्याच्या संरचनेचे उच्च भरती – ओहोटी आणि त्सुनामी सारख्या परिस्थितीत कशा प्रकारे संरक्षण करतील हे तपशीलवार सांगितले आहे.
कोस्टल रोडचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बोगदा..
देशातील सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीन ‘मावळा’ च्या मदतीने हा बोगदा खोदण्यात आला आहे. हा बोगदा गिरगाव चौपाटी मलबार हिल ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत बांधण्यात आला आहे. पहिल्या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दुसऱ्या समांतर बोगद्याचे कामही पूर्णत्वास आले आहे. मलबार हिलमध्ये हा बोगदा जमिनीपासून सुमारे 75 मीटर खाली बांधला आहे आणि गिरगाव चौपाटीमध्ये हा बोगदा जमिनीपासून 25 मीटर खाली बांधला आहे.
बोगदा बांधताना कोणती होती आव्हाने ?
हा बोगदा तयार करताना अनेक आव्हाने होती. समुद्रातून लाटा उसळत असतानाही अथक परिश्रमानंतर या बोगद्याचा पहिला भाग पूर्ण झाला आहे. बोगद्यात सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घेण्यात आली आहे जसे की बोगद्यात प्रत्येक 300 मीटर अंतरावर क्रॉसवे असणार आहे.
वाहनचालकांना चालण्यासाठी पायवाट असेल. एका बोगद्यात 3 लेन असतील. दोन लेन वाहनांसाठी असतील तर तिसरी लेन आपत्कालीन परिस्थितीसाठी असणार आहे.
बोगद्यात अग्निसुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे. येथे रात्रंदिवस काम सुरू असून मुख्य जंक्शन असल्याने येथे सतत वाहतुकीची समस्या असते. या सर्व समस्या असतानाही बांधकामे सुरूच आहेत. प्रकल्प अभियंता चेतन खेडेकर यांनी संपूर्ण बांधकाम कसे सुरू आहे हे सांगितले.