नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे. पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत वगळले गेले होते आता त्या शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे.
जे शेतकरी 2017- 18, 18 -19, 19 -20 यांपैकी दोन वर्षे नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे आणि या अनुदानासंदर्भातील पहिली यादी 12 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आली.
तर या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी 1 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित केली जाईल असं अपडेट आपण घेतलं होतं, परंतु आता थोडीशी दिरंगाई झाल्यानंतर दुसरी यादी आज 5 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे.
परंतु, जास्त लाभार्थी संख्या असलेल्या कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे व सांगली, जिल्ह्याच्या याद्या अपलोड झाल्या असून इतर जिल्ह्याच्या याद्या हळूहळू अपलोड होणार असून या याद्या CSC धारकांच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
हे पण वाचा
Aurangabad – Pune Expressway सुसाट, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवीन घोषणा
यामध्ये ज्या खासगी बँका, सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकाच्या याद्या अपलोड करण्यास उशीर होत होता, परंतु आता या याद्याही जिल्हानिहाय अपलोड होत आहे. तसेच जास्त लाभार्थी संख्या असलेला डाटा चुकीचा असलेल्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या नाहीत, परंतु योग्य डाटा – जास्त लाभार्थी संख्या असलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये कमी लाभार्थ्याची यादी अपलोड केलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या यामध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या जिल्ह्यांच्या याद्या दिसत नाही त्यांनी थोडी वाट पाहावी लागणार आहे. या याद्याही काही दिवसांत करेक्ट करून अपलोड करण्यात येणार आहे.
50,000 अनुदानाच्या यादीत तुमचं नाव कसं चेक कराल ?
सर्वप्रथमी तुम्हाला आधार कार्ड घेऊन जवळच्या CSC सेंटरला जा. .
तुमचे नाव पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा – CSC LOGIN लॉगिन करायचं आहे.
यामध्ये तुम्हाला ‘महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना’ हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर तिथे तुम्ही फक्त आधार नंबर टाकून शेतकऱ्याचे नाव आहे का नाही हे पाहू शकता.
त्यानंतर तुम्हाला ‘Loan Account History’ वर क्लिक केल्यानंतर तुम्ह नाव आहे की नाही ते दिसेल.
टीप : सर्व जिल्ह्यांच्या दुसऱ्या याद्या हळूहळू अपलोड होत असून याद्या ज्या – ज्या जिल्ह्यांच्या याद्या अपलोड होत आहे. त्याबद्दल अपडेट आपण घेणार आहोत. तत्पूर्वी पुणे जिल्ह्याची दुसरी यादी अपलोड झाली आहे. PDF यादी डाऊन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
पुणे जिल्हा दुसरी यादी |