स्वस्तात मस्त मायलेजची चॅम्पियन टू- व्हीलर, काश्मीर ते कन्याकुमारी अंतर फक्त 3900 रुपयांत पार कराल, पहा किंमत
जेव्हा आपण मायलेज देणाऱ्या बाइक्सबद्दल बोलतो तेव्हा आपसूकच बजाजचे नाव आपल्या ओठांवर येते. बजाजकडे असे अनेक मॉडेल्स आहेत, ज्यांचे मायलेज 70 ते 90 km प्रति लिटर पर्यंत आहे. त्याचबरोबर हायवेवर टॉप गिअरमध्ये ठराविक वेग ठेवला तर मोटारसायकलचे मायलेज आणखी वाढू शकते.
विशेषतः बजाज CT100 चा विचार केला तर मायलेजच्या बाबतीत ती इतर सर्व मोटारसायकलींपेक्षा वरचढ ठरते. या दुचाकीचे मायलेज इतके उत्तम आहे की तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास फक्त ३९०० रुपयांत करू शकता. म्हणजेच, जर दोन व्यक्ती दुचाकीवरून प्रवास करत असतील तर एका व्यक्तीला केवळ 1,950 रुपये इतकाच खर्च येईल.
39 लिटर पेट्रोलमध्ये भारतभ्रमण. .
बजाज CT100 1 लिटर पेट्रोलमध्ये 90Km मायलेज देते तर, काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर 3524Km आहे. म्हणजेच 3524Km बाइक चालवण्यासाठी 39 लिटर पेट्रोल खर्च होईल. 1 लिटर पेट्रोलची सरासरी किंमत 100 रुपये मानली तर 39 लिटर पेट्रोलची किंमत 3900 रुपये होते. दुचाकीवरून दोन लोक प्रवास करत असतील, तर एका व्यक्तीसाठी खर्च केवळ 1,950 रुपये इतका असेल. या बाईकमध्ये 10 लिटरची पेट्रोल टाकी आहे. म्हणजे एकदा टाकी पूर्ण भरली तर तुम्ही 900Km पर्यंत प्रवास करू शकता. हा हिशोब लावला तर काश्मीरहून कन्याकुमारीला जाताना फक्त 4 वेळा टाकी भरावी लागणार आहे.
Bajaj CT100 चे फीचर्स आणि डिटेल्स
बजाज CT100 मध्ये 99.27cc, 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, नेचर एअर कूल्ड इंजिन आहे. हे सुमारे 8Hp पॉवर आणि 8.34Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास इतका आहे. बाईकच्या पुढील बाजूस हायड्रॉलिक टेलिस्कोपिकसह 125mm व्हील आणि मागील बाजूस SNS सस्पेंशनसह 100mm व्हील आहेत. दोन्ही चाकांवर 110 ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत.
ही कॉम्पॅक्ट मोटरसायकल अतिशय सरळ आणि साध्या डिझाइनमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यात सिंगल-पीस सीट, हॅलोजन लाइट, फुल बॉडी ग्राफिक्स, अलॉय व्हील आणि कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टम (CBS) सारखी वैशिष्ट्ये आहेत. ही मोटारसायकल ब्लू डेकल्ससह ग्लॉस एबोनी ब्लॅक, मॅट ऑलिव्ह ग्रीनसह येलो डेकल्स, ब्राइट रेड डेकल्ससह ग्लॉस फ्लेम, ग्लॉस एबोनी ब्लॅक, मॅट ऑलिव्ह ग्रीन आणि ग्लॉस फ्लेम रेडमध्ये खरेदी केली जाऊ शकते.
बजाज CT100 ची किंमत
बजाजच्या मोस्ट मायलेज असलेल्या CT100 मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 52,832 रुपये आहे. त्याच वेळी, तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 53,696 रुपये आहे. आता ही बाईक 110cc आणि 125cc या दोन पर्यायांमध्येही उपलब्द्ध आहे.