पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे भारतात सीएनजी कार्सची मागणी वाढत आहे. आता तर प्रीमियम गाड्याही सीएनजीमध्ये येत आहेत. आता तर अशी माहिती समोर येत आहे की टोयोटा आपल्या लोकप्रिय हॅचबॅक कार ग्लान्झाचे CNG व्हेरिएंट देखील भारतात लॉन्च केलं आहे, नुकतेच मारुती सुझुकीने भारतात बलेनोचे CNG मॉडेल देखील लॉन्च केलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन टोयोटा ग्लान्झा CNG चे अनऑफिशियल बुकिंग सुरु झालं आहे. काही डीलरशिप त्यांच्या पद्धतीने बुकिंग करत आहेत. विशेष बाब म्हणजे ग्लॅन्झाच्या रूपात टोयोटाची ही पहिली सीएनजी कार असणार आहे.
टोयोटा ग्लान्झा आणि मारुती सुझुकी बलेनो अनेक बाबतीत सारख्याच आहेत त्यांचे फीचर्स बऱ्याच प्रमाणात सारखे आहेत. मारुती सुझुकीच्या गाड्या एस-सीएनजी म्हणून ओळखल्या जातात तर टोयोटा कार ई-सीएनजी म्हणून ओळखल्या जातात.
सीएनजी मोडमध्ये कमी मिळणार पॉवर
या कारचे इंजिन पाहायला गेल्यास, टोयोटा ग्लान्झा CNG ला 1.2-लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल जे CNG किटसह सुसज्ज असेल. हे इंजिन 89bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क देते. पण CNG मोडमध्ये त्याची पॉवर आणि टॉर्क कमी होईल, CNG मॉडेलमध्ये हेच इंजिन 76bhp पॉवर आणि 98.5Nm टॉर्क देते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सची सुविधा मिळेल. हे इंजिन स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह येईल.
असे मानले जाते की, नवीन ग्लान्झा CNG 30Km / Kg मायलेज देऊ शकते. Toyota ग्लान्झा CNG तीन व्हेरियंटमध्ये बाजारात लॉन्च केली जाऊ शकते – S, G आणि V.
ग्लान्झा CNG व्हेरिएंटच्या किमती लवकरच जाहीर केल्या जातील, या वर्षाच्या अखेरीस याची अनाउन्समेंट होईल अशी आशा आहे. CNG व्हेरिएंटची किंमत पेट्रोल मॉडेलपेक्षा 70,000 रुपयांपर्यंत महाग असण्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. त्यामुळे या कारची किंमत 8.43 लाखांपासून सुरु होण्याची शक्यता आहे.