शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : सोयाबीन साडेसहा हजारांवर, या समितीत मिळाला सर्वाधिक दर; केंद्राच्या ‘या’ निर्णयामुळे पोहचणार 8 हजारांवर !
खरिपातील नगदी पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होता. पेरणीपासून मुसळधार पाऊस व तद्नंतर अतिवृष्टी व त्यानंतर एक महिना पावसाची उघाड तसेच सोयाबीनच्या राशी सुध्दा शेतकऱ्यांना पावसातच कराव्या लागल्या. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांना मजूर लावून सोयाबीन वाळून घ्यावे लागले.
काही शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन डागी झाले. डागी मालाचा भाव व्यापारी पाडून मागतात. त्याचा ही फटका शेतकऱ्यांना बसला आहे सोयाबीनच्या बॅगा खरेदी करणे, त्यानंतर खताचा वापर करून पेरणी, निंदणाचा मोठा खर्च, किमान 3 वेळा फवारणी व राशी करताना एका बॅगला 5 हजाराचा खर्च व त्यानंतर वाळवणे, अखेर विक्रीसाठी बाजारपेठेत नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च बघता सध्या असलेला भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
गतवर्षी सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 7 हजार रुपयांपर्यंत होता. यावर्षी सोयाबीन बघून व चांगल्या दर्ज्याच्या मालाला 5 हजार 200 रुपये भाव आहे. सध्या शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत करून टाळकी ज्वारी, हरभरा, करडई या पिकाची पेरणी करण्यात व कापसाची वेचणी करण्यात व्यस्त असून रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर जर सोयाबीनचा भाव वाढला तर बाजारपेठांत सोयाबीनची आवक वाढू शकते.
आज राज्यातल्या सोलापूरच्या बाजार समितीत सोयाबीनला सर्वात जास्त भाव 6 हजार 500 रुपये आहे तर लातूर बाजारपेठेत 5 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भाव वाढणार. .
केंद्राने तेल व तेलबिया साठवण्याबाबतच्या लागू केलेला निर्बंध आदेश मागे घेतला आहे. त्यामुळे 3-4 दिवसापासून सोयाबीनचा साठा करणारे व्यापारी सक्रिय झाले आहेत. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. बाजारात तुलनेने सोयाबीनची आवक कमी असल्याने आणि प्रक्रियादार कारखानदाराकडून सोयाबीनची मागणी वाढल्याने आवक चांगली यावी यासाठी भाववाढ प्रतिक्विंटल 7500 ते 8000 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव पुढीलप्रमाणे आहेत
अकोला मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4400 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5490 रुपये प्रतिक्विंटल आहे.
कोपरगाव मार्केटमध्ये सोयाबीनचा किमान भाव 4500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5657 रुपये प्रति क्विंटल आहे.
भोकर मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4050 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5605 रुपये प्रति क्विंटल आहे.
पैठण मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4401 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 4975 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे.
गंगाखेड मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 5400 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5500 रुपये प्रति क्विंटल आहे.
नागपूर मार्केटमध्ये सोयाबीनचा किमान भाव 4400 रुपये प्रति क्विंटल आणि कमाल भाव 5490 रुपये प्रति क्विंटल आहे.
लातूर मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4952 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5811 रुपये प्रति क्विंटल आहे.
राहता मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4536 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5626 रुपये प्रति क्विंटल आहे.
श्रीरामपूर मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5500 रुपये प्रति क्विंटल आहे.
कर्जत (अहमहदनगर) मार्केटला सोयाबीनचा किमान भाव 4500 रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव 5500 रुपये प्रति क्विंटल आहे.