अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी संधी! आपले सरकार सेवा केंद्र अर्ज झाले सुरु, पहा पात्रता, कागदपत्रे, PDF फॉर्म, अर्ज प्रोसेस
आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जासंदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील रिक्त असलेल्या 32 जागांकरता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत आणि यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी जाहिरात काढून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये 19 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार, अहमदनगर जिल्ह्यामधील ग्रामपंचायत – नगर परिषद परिसरामध्ये रिक्त असलेल्या 32 आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
इच्छुक अर्जदारांनी दिनांक 07/11/2022 ते 10/11/2022 या कालावधीत या कार्यालयाचे संकेतस्थळ www.ahmednagar.nic.in वरुन विहित अर्ज डाऊनलोड करुन आवश्यक त्या कागदपत्रासह आपले कार्यक्षेत्रातील उपविभागीय कार्यालय (प्रांत कार्यालय) संगमनेर, कर्जत, श्रीगोंदा – पारनेर, पाथर्डी, श्रीरामपूर, नगर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्ज जमा करण्यास सांगितले आहे.
दिनांक 10/11/2022 रोजी सायं. 5.00 वाजे नंतर प्राप्त अर्जावर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
तालुकानिहाय रिक्त जागा पहा
अकोले :- अंबितखिंड, घोटी, साकिरवाडी, मोग्रस, पिंपळगाव खांड, कोंडाणी, पाचनई, बारी
कर्जत :- सितपूर
पारनेर :- म्हस्केवाडी, पाबळ, पिंप्रीपठार
पाथर्डी :- नांदूर निंबादैत्य, शेकटे, डोंगरवाडी, डमाळवाडी
राहुरी :- वावरथ, कुरणवाडी, बाभुळगाव, बोधेगाव, मोमीन आखाडा, देवळाली प्रवरा नगरपरिषद
संगमनेर :- ओझर खुर्द, मिरपूर, कणकपूर, महालवाडी, खांजापूर
शेवगाव :- बोडखे, खडके
नगर :- खांडके
श्रीरामपूर नगरपरिषद
नेवासा :- निभारी
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जाची PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा
आपले सेवा केंद्राबाबत अटी आणि शर्ती :-
आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज हा जिल्हा सेतु समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे करावा.
अर्ज करणारा नागरिक हा त्या गावचा नगरपरिषदेचा रहिवासी असावा. जर त्या गावासाठी / नगरपरिषदेसाठी अर्ज आला नसेल तर इतरा अर्जाचा विचार करण्यात येईल. तत्पूर्वी तो ग्राहय धरण्यात येणार नाही.
नागरिक फक्त एकच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करु शकतात. त्याचे कुटुंबातून दुसरा अर्ज असल्यास ज्या कुटुंबामध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरवातीपासूनच असेल त्यांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही अर्जामध्ये जर माहिती चुकीची असेल तर त्याच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही तसेच त्याच्यावर कायदेशीर कार्यवाहीसुध्दा करणेत येईल.
आपले सरकार सेवा केंद्र यांना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांचे वेळोवेळी येणारे आदेश मान्यः करावे लागतील. आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी देणेत येईल त्याच ठिकाणी ते कार्यरत असणे आवश्यक राहील आपले सरकार सेवा केंद्राची जागा बदललेस संबंधीत आपले सरकार सेवा केंद्र बंद करणेत येईल.
शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 नुसार सर्व अटी व शर्ती मान्य राहतील.
शासनाव्दारे दिलेल्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून देणे अनिवार्य राहील. शासन निर्णय 19 जानेवारी 2018 नुसार आपले सरकार सेवा केंद्राचे बॅनर ( परिशिष्ट ड). तसेच केंद्रामार्फत देणेत येणा -या सेवा (परिशिष्ट क), दर्शनी भागात सेवानिहाय रेट चार्ट लावणे आवश्यक राहिल.तसेच नागरिकांसाठी बसण्याची सोय व आवश्यक तथा सर्व बाबीची परिपूर्तता करावी लागेल.
उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन करावे लागेल. सर्व प्रकारचे डिजिटल पेमेंटला प्राधान्य दयावे लागेल शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र सुरु ठेवावे लागेल, शासनाचे सर्व साहित्य याचे काटकसरीने वापर संरक्षण व जतन करणे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यानी नियुक्त केलेला तांत्रिक अधिकारी हे आपले सरकार संपूर्ण चौकशी करू शकतील .