एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटाचे आपला दबदबा कायम ठेवला आहे. कंपनीने अलीकडेच टाटा नेक्सॉन व्हेरियंट, लाइनमध्ये काही मोठे बदल जाणार असल्याचे जाहीर केले आहे. टाटा ने भारतातील सर्वात जास्त मागणी असलेल्या SUV चे काही व्हेरियंट बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. आता हे व्हेरियंट भारतीय बाजारपेठेत विकले जाणार नाहीत. टाटा नेक्सॉन सध्या ह्युंदाई व्हेन्यू, किया सॉनेट,महिंद्रा XUV300 यासारख्या मोठ्या ब्रॅण्डशी स्पर्धा करत आहे. टाटा नेक्सॉनची भारतातील किंमत 7.60 लाख रुपयांपासून सुरू होते.
टाटा नेक्सॉनचे हे व्हेरियंट झाले आहेत बंद
कंपनीने टाटा नेक्सॉनचे XZ, XZA, XZ+ (O), XZA+ (O), XZ+ (O) डार्क आणि XZA+ (O) डार्क चे 6 व्हेरियंट बंद केले आहेत. कंपनी आता बंद झालेले व्हेरियंटच्या बदल्यात XZ+ (HS), XZ+ (L) आणि XZ+ (P) हे व्हेरियंट बाजारात आणले आहेत. तरीसुद्धा, भारतीय बाजारपेठेत डार्क, काझीरंगा आणि जेट हे व्हेरियंट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग
टाटा नेक्सॉनला मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कूल्ड स्टोरेज कन्सोल, पुश-बटण स्टार्ट, कनेक्टेड कार टेक इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत. त्याच वेळी, सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या कारने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवले आहे. टाटा नेक्सॉन ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात सुरक्षित SUV आहे.
टाटा नेक्सॉनचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल
टाटा भारतीय बाजारपेठेसाठी टाटा नेक्सॉनच्या नेक्स्ट जनरेशनच्या मॉडेलवरही काम करत असल्याचे मानले जात आहे. नेक्स्ट जनरेशनची टाटा नेक्सॉन ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची अपेक्षा आहे.
यामध्ये डिझाइन तर अपडेट केले जाईलच, त्यासोबत अद्ययावत केबिन आणि विविध पॉवरट्रेन असे देखील पर्याय उपलब्ध असतील. नेक्स्ट जनरेशनचे मॉडेल आगामी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये टाटा सफारी फेसलिफ्ट आणि टाटा हॅरियर फेसलिफ्टसह प्रदर्शित केले जाऊ शकते.