Take a fresh look at your lifestyle.

Monsoon 2023 : महाराष्ट्रात पावसाचं दमदार ‘कमबॅक ! विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत IMD चा यलो अलर्ट..

0

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जारी केला आहे. IMD नुसार, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख केएस होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे.

पुढील चार – पाच दिवस महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता..

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या 4 ते 5 दिवसांत राज्यात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. पुढील 48 तास महत्त्वाचे असतील. त्या स्थितीमुळे महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 3 ते 7 सप्टेंबर या कालावधीत कोकण – गोव्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे. (Monsoon 2023)

महाराष्ट्रात कुठे – कुठे पाऊस पडणार ?

भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या पाच दिवसांत विदर्भात पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातही पावसाचे पुनरागमन होऊ शकते. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी हिंगोली जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस..  

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यतचा सर्वात कमी पाऊस..

राज्यासह देशात गेल्या 100 वर्षांत जे घडले नाही ते ऑगस्ट महिन्यात घडले. ऑगस्ट महिन्यातील पावसाने परिस्थिती उघड केली. ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी कमतरता होती. त्यामुळे किमान सप्टेंबर महिन्यात पाऊस पडून दिलासा मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

या गोष्टी करा : –

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा.
जर मोकळ्या जागत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या.
घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका : –

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर नका.
शॉवरखाली आंघोळ करू नका.
घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका.
हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. याबाबत सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.