आता देशात काम करणाऱ्या लोकांसाठी नवा नियम आला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर पगारदार वर्गाचा इनहँड पगार वाढणार आहे. नोकरदारांसाठी ही दिलासादायक बातमी आयकर विभागाकडून आली आहे. आयकर विभागाने कंपनीकडून कर्मचाऱ्यांना भाड्याने दिल्या जाणाऱ्या निवासाच्या नियमात बदल केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांचा टेक होम सॅलरी म्हणजेच हातातील पगारात वाढ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अधिक बचत होणार आहे. भाडेमुक्त निवासाशी संबंधित नियमांमधील 1 सप्टेंबरपासून बदल लागू झाले आहेत.. (Income Tax Rules)
व्हॅल्युएशन मध्ये होणार बदल..
CBDT नुसार, केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी सोडून इतर कर्मचारी, जे कंपनीच्या मालकीच्या घरात राहतात. त्यांच्या व्हॅल्युएशनचे मूल्यांकन आता बदलले आहे. नवीन नियमानुसार, जिथे कर्मचाऱ्यांना कंपनीकडून अनफर्निश अॅमोडेशन दिले जाते. अशा निवासस्थानाची मालकी कंपनीकडेच असते. त्याचे मूल्यांकन आता वेगळे असणार आहे. आता ज्या शहरी भागातील लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 40 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना HRA चे वेतन 10 टक्के असेल. यापूर्वी 2001 च्या जनगणनेनुसार 25 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पगाराच्या 15 टक्के इतका होता..
कर्मचाऱ्यांचा कसा होणार फायदा ?
अशाप्रकारे सोप्या भाषेत समजते. समजा एखादा कर्मचारी कंपनीने दिलेल्या घरात राहत आहे. त्यासाठीचे कॅल्क्युलेशन आता नव्या सूत्रानुसार केले जाणार आहे. त्याचे कारण म्हणजे दर कमी करण्यात आला आहे.
याचा अर्थ एकूण पगारातून कमी कपात होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला वाढणार आहे. एकीकडे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांची बचतही वाढेल अन् सरकारी महसुलातही घट होईल..