शेतीशिवार टीम, 31 डिसेंबर 2021 : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे 8067 नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचे 4 रुग्णांचाही समावेश आहे.
हे रुग्ण वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सुमारे 2700 अधिक रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 8 हजारांहून अधिक नवीन रुग्णांमध्ये एकट्या मुंबईत आज तब्बल 5 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. तर अँक्टीव्ह रुग्णांची संख्या 24,509 वर पोहोचली आहे.
शुक्रवारीही आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 1766 लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्रात झपाट्याने होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता तिसरी लाट येण्याची शक्यता डॉक्टर आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाच्या रुग्णामध्ये वाढ होत असल्याने राज्य सरकारने खुल्या किंवा बंद ठिकाणी कार्यक्रमांसाठी जमणाऱ्यांची संख्या 50 पर्यंत मर्यादित केली आहे. याआधी विवाह समारंभ किंवा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक मेळावे यांना बंद जागेत 100 आणि खुल्या जागेवर 250 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी होती.
Maharashtra reports 8,067 fresh COVID cases (including 4 #Omicron cases), 1,766 recoveries, and 8 deaths today
Active cases: 24,509
Total recoveries: 65,09,096 pic.twitter.com/V2czjz7X8p— ANI (@ANI) December 31, 2021
गुरुवारी, राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची 198 नवे रुग्ण आढळले असून एकट्या मुंबईतील 190 प्रकरणांचा समावेश आहे. शुक्रवारीही 4 रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे, राज्यात कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्यांची संख्या आता 454 वर पोहोचली आहे.
कोणत्या जिल्ह्यात ओमिक्रॉनचे किती रुग्ण?
मुंबई : 327
पिपंरी-चिंचवड : 26
पुणे ग्रामीण : 18
पुणे महापालिका, ठाणे महापालिका : 12
नवी मुंबई, पनवेल : प्रत्येकी 8
कल्याण, डोंबिवली : 7
नागपूर, सातारा : प्रत्येकी 6
उस्मानाबाद : 5
वसई विरार : 4
नांदेड : 3
औरंगाबाद, बुलडाणा, भिवंडी, निजामपूर महापालिका, मीरा भाईंदर : प्रत्येकी 2
लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर : प्रत्येकी 1