शेतीशिवार टीम, 31 डिसेंबर 2021 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. केएल राहुलची वनडे संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. 

भारत 19 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केएल राहुलकडे कसोटी संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आलं आहे.

जसप्रीत बुमराहला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. शिखर धवन आणि युझवेंद्र चहल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मोहम्मद शमीला वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ही मालिकायासाठी महत्त्वाची आहे,

कारण विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर ही भारताची पहिली एकदिवसीय मालिका आहे. रविचंद्रन अश्विन दीर्घ कालावधीनंतर वनडे संघात पुनरागमन करत आहे. अलीकडेच त्याने टी-20 विश्वचषक स्पर्धेत पुनरागमन केलं होतं.

ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केल्याने त्यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदरचाही वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ :

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *