Take a fresh look at your lifestyle.

Share Market : 2021 मध्ये ‘या’ शेयर्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल ; 1 लाखांत गुंतवणूकदार झाले करोडपती !

0

शेतीशिवार टीम, 31 डिसेंबर 2021 : 2021 हे वर्ष Covid-19 मुळे सर्वत्र अंधकारमय झालं असलं तरी काही शेयर्सनी या कठीण काळातही गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. ज्या लोकांनी या शेअर्समध्ये पैसे गुंतवले त्यांना प्रचंड नफा झाला आहे. जाणून घेऊया ते 5 शेअर्स ज्यांनी गुंतवणूकदारांना करोडपती केलं..

1- ( DIGJAM Ltd ) – 

टेक्सटाइल इंडस्ट्री मधील दिग्गज कंपनी (DIGJAM) कंपनी या यादीत अव्वल आहे. कंपनीने यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना 5,935% रिटर्न्स दिले आहे. 31 डिसेंबर 2020 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 4.10 रुपये होती. जे 31 डिसेंबर 2021 रोजी वाढून 247.45 रुपये झाली आहे. अशा परिस्थितीत वर्षभरापूर्वी जर कोणी DIGJAM मध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 59.35 लाख रुपये झाले असते.

2 – Adinath Textiles :- 

दुसरा स्टॉक देखील टेक्सटाइल उद्योगाशी संबंधित आहे. आदिनाथ टेक्सटाईल (Adinath Textiles) कंपनीच्या शेअरच्या भावात एका वर्षात 4800% वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 1.71 रुपये होती. जो आता 84.5 रुपये झाला आहे. म्हणजेच, जर एखाद्याने 0.86 रुपयांच्या शेअरच्या किमतीत कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ते 48.23 लाख रुपये झाले असते.

3- TTI Enterprises LTD :- 

तिसरा पेनी स्टॉक म्हणजे TTI Enterprises LTD, ज्याच्या शेअरची किंमत 31 डिसेंबर 2020 रोजी 1.33 रुपये होती. जे एका वर्षानंतर 62.10 रुपये झाले आहे. म्हणजेच सुमारे ४५६९ टक्के परतावा मिळाला आहे. म्हणजेच एका वर्षात 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 45.69 लाख रुपयांचा परतावा मिळाला.

4 – Gita Renewable Energy :- 

2021 मध्ये गीता रिन्युएबल एनर्जीनेही आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहे. कंपनीच्या शेअरची किंमत पाहता वर्षभरात तो 6.70 रुपयांवरून 241.70 रुपयांवर पोहोचला. गुंतवणूकदारांना 3500 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स मिळाले. वर्षभरापूर्वी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 35.07 लाख रुपये झाली आहे.

5 – Radhe Developers India :- 

राधे डेव्हलपर्स (इंडिया) लिमिटेड ही पाचवी कंपनी आहे, या कंपनीने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 3200 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहे. एका वर्षापूर्वी कंपनीच्या शेअरची किंमत 9.24 रुपये होती, ती आज 309.10 रुपये झाली आहे. म्हणजेच एक लाख रुपये 32.45 रुपये झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.