Maharashtra : सरकारी अधिकारी होण्याची मोठी संधी ; MPSC तर्फे तब्बल 800 पदांसाठी भरतीची घोषणा ; पहा पात्रता, कसा कराल अर्ज ?
शेतीशिवार टीम, 29 जून 2022 : महाराष्ट्रातील तरुणांना सरकारी अधिकारी बनण्याची मोठी संधी आहे. लोकसेवा आयोगाने गट ब पदांसाठी बंपर रिक्त जागा (MPSC Group B Recruitment 2022) जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
अर्जाची प्रक्रिया 24 जूनपासून सुरू झाली असून त्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 आहे. या रिक्त पदांतर्गत एकूण 800 पदे भरण्यात येणार आहेत.
वॅकन्सी डिटेल्स :-
MPSC ने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत तब्बल 800 पदे भरली जाणार आहे. यामध्ये उपनिबंधकांची 603 पदे, राज्य कर निरीक्षक (Tax inspector) 77, पोलीस उपनिरीक्षक 78 आणि सहायक विभाग अधिकारी यांची 42 पदे आहेत. जे उमेदवार या सर्व पदांवर नोकरी करायची सेल तर त्यांनी पात्रतेनुसार शेवटच्या तारखेपूर्वी या पदांसाठी अर्ज करता येणार आहे.
कोण करू शकतो अर्ज :-
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार. त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच मराठी भाषेचे ज्ञान असणेही बंधनकारक आहे. या भरतीसाठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांचे वय 18 ते 38 वर्षे आहे…
अर्ज फी :-
उमेदवार ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 394 रुपये आहे. तर राज्यातील राखीव प्रवर्ग आणि अनाथांसाठीच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 294 रुपये आहे..
अधिक माहितीसाठी येथे CLICK करा.