30 MPSC Interview Questions : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत कोणती ?

0

शेतीशिवार टीम, 29 जून 2022 :- 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक तरुण मुले सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करू लागतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष स्पर्धा परीक्षकांकडे वळतं, मग त्यामध्ये यूपीएससी / एमपीएससी या अवघड परीक्षा पास करणं त्यांचं ध्येय बनतं.

उमेदवारांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात, स्पर्धा कोणतीही असो. तयारीसाठी, अभ्यासक्रमानंतर, जास्तीत जास्त लक्ष सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडींवर केंद्रित केले पाहिजे.

कारण लेखी परीक्षा असो किंवा उमेदवारांची मुलाखत असो, येथे अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यातील काही प्रश्न अवघड असतात तर काही प्रश्न सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आपण सामान्य ज्ञानाचे असेच काही प्रश्न जाणून घेणार आहोत…

प्रश्न – मेंदूची स्टोरेज कॅपेसिटी किती आहे?
उत्तर – मेंदूची स्टोरेज कॅपेसिटी 10 लाख GB इतकी आहे.

प्रश्न – लाल केळी जगातील कोणत्या देशात आढळते ?
उत्तर – जगात लाल केळी ऑस्ट्रेलियामध्ये आढळते.

प्रश्न – भारतातील कोणत्या नदीत हिरा सापडतो ?
उत्तर – भारतातील एकमात्र कृष्णा नदीमध्ये हिरा आढळतो.

प्रश्न – भारतामध्ये सर्वात जास्त अंडी कुठे आढळतात?
उत्तर – आंध्र प्रदेशात सर्वात जास्त अंडी आहेत हे तुम्हाला माहीत असावे.

प्रश्न – शरीराच्या कोणत्या भागाला रक्तपुरवठा होत नाही?
उत्तर – कॉर्निया हा आपल्या डोळ्याचा असा भाग आहे जिथे रक्तपुरवठा होत नाही.

प्रश्न – असं कोणतं ठिकाणआहे जिथे सूर्य हिरवागार दिसतो ?
उत्तर – अंटार्क्टिक महासागरात सूर्य हिरवा दिसतो.

प्रश्न – पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे?
उत्तर – शहाबाज शरीफ

प्रश्न – HDFC चा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर – Housing Development Financial Corporation हा आहे.

प्रश्न – IFSC चा फुल फॉर्म काय आहे?
उत्तर – Indian Financial System Code हा आहे.

प्रश्न – नागालँडची पहिली महिला राज्यसभा सांसद कोण ?
उत्तर – Phangnon Konyak

प्रश्न – लता मंगेशकर 2022 पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तर – पंतप्रधान नरेंद्र मोदी, आशा पारेख, राहुल देशपांडे, जॅकी श्रॉफ.

प्रश्न – 2022 पंजाब इलेक्शन मध्ये आम आदमी पक्षाने किती जागा जिंकल्या?
उत्तर – आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकल्या.

प्रश्न – पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण ?
उत्तर – भगवंत सिंग मान

प्रश्न – भारत देशाचे नवे विदेश सचिव कोण ?
उत्तर – विनय मोहन कात्रा (एप्रिल 2022)

प्रश्न – NITI आयोगाचा फुल फॉर्म?
उत्तर – National Institution for Transforming India.

प्रश्न – NITI आयोगाचे सध्याचे CEO?
उत्तर – अमिताभ कांत

प्रश्न –T20 World Cup 2024 चा सामना कोठे होणार आहे:-
उत्तर – वेस्ट इंडिज आणि अमेरिका

प्रश्न – UPSC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर – डॉ. मनोज सोनी.

प्रश्न – मार्च 2022 मध्ये गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली ?
उत्तर – प्रमोद सावंत

प्रश्न – जगातील सर्वात ईमानदार देश कोणता आहे ?
उत्तर – न्यूझीलंड हा जगातील सर्वात ईमानदार देश मानला जातो.

या लिस्टमध्ये न्यूझीलंड आणि डेन्मार्क संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत, तर फिनलंडला ईमानदारसाठी तिसरे स्थान मिळाले आहे. डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलंड, सिंगापूर आणि स्वीडन हे कोरोनाच्या काळात सर्वात ईमानदार पाच देश ठरले आहेत. तर, सर्वाधिक भ्रष्टाचार असलेले देश – व्हेनेझुएला, येमेन, सीरिया, सोमालिया आणि दक्षिण सुदान…

प्रश्न – जगात होमवर्कची सुरुवात सर्वप्रथम कोणी सुरु केली ?
उत्तर – Roberto Nevilis ने होमवर्कची सुरुवात केली.तो इटलीचा रहिवासी होता. त्यांनी 1905 मध्ये होमवर्क सुरू केला.

प्रश्न – हेल्मेटला मराठीत काय म्हणतात ?
उत्तर – शिरस्त्राण

प्रश्न – असं काय आहे, जे जितकं जास्त काम करेल तितकं ते वाढतं जातं ?
उत्तर – बुद्धी

प्रश्न – शरीराची अशी कोणती अवस्था आहे, त्या अवस्थेत शरीरात एकही बॅक्टेरिया नसतो ?
उत्तर – नवजात बाळाच्या शरीरात एकही बॅक्टेरिया आढळतं नाही.

प्रश्न – महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत कोणती ?
उत्तर – अकलूज (जिल्हा सोलापूर)

प्रश्न – भारतात ज्या दोरीने फाशी दिली जाते त्या दोरीचं नाव काय आहे ?
उत्तर – भारतात ज्या दोरीच्या साहाय्याने फासावर लटकवले जाते त्याचे नाव मनिला रोप आहे आणि ती दोरी फक्त बिहारच्या बक्सर तुरुंगात बनवली जाते.

प्रश्न – आशिया खंडात एकूण किती देश आहेत ?
उत्तर – आशिया खंडात एकूण 50 देश आहेत.

प्रश्न – क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठं विमानतळ कोणतं ?
उत्तर – सौदी अरेबियाचे किंग फहद विमानतळ हे क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठं विमानतळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.