IAS Interview Questions : परदेशात भारताचा ध्वज फडकवणारी पहिली महिला कोण ?
UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : गौतम बुद्धाने त्यांचा उपदेश कोणत्या ठिकाणी दिला होता?
उत्तर : सारनाथ
प्रश्न : महात्मा गांधी कोणत्या वर्तमान पत्राचे संपादक होते ?
उत्तर : हरिजन
प्रश्न : इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचा अर्थ नेमका काय आहे ?
उत्तर : क्रांतिचा विजय असो !
इन्कलाब झिंदाबाद हा हिंदुस्थानी (भारतीय) भाषेचा नारा आहे, ज्याचा अर्थ हिंदीत ‘क्रांति की जय हो’। म्हणजे ‘क्रांतिचा विजय असो’ ! असा आहे. 8 एप्रिल 1929 रोजी दिल्ली विधानसभेत ध्वनी बॉम्बचा स्फोट झाला होता तेव्हा भगतसिंग आणि त्यांच्या क्रांतिकारांनी हा नारा दिला होता. प्रसिद्ध कवी हसरत मोहनी यांनी आझादी-ए-कामील (संपूर्ण स्वातंत्र्य) मिरवणुकीत बोलताना इन्कलाब जिंदाबादचा प्रथम नारा दिला होता.
प्रश्न : आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती त्यांचे पद स्वीकारताना कोणापुढे शपथ घेतात ?
उत्तर : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
प्रश्न : पंजाबला 5 नद्यांचं राज्य म्हणतात त्या 5 नद्यांची नावे सांगू शकता का ?
उत्तर : झेलम, चिनाब, रावी, बिआस आणि सतलज.
प्रश्न : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हे 4 ही सन्मान मिळवणारे पहिले कलाकार कोण ?
उत्तर : उस्ताद बिस्मिल्ला खान
उस्ताद बिस्मिल्ला खान (जन्म : 21 मार्च 1916 – मृत्यू : 21 ऑगस्ट 2006) हे भारतातील प्रसिद्ध शहनाई वादक होते. त्यांचा जन्म बिहारमधील डुमराव येथे झाला. 2001 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नने सन्मानित केलं गेलं…
प्रश्न : 10 हजारांची चिल्लर देऊन उमेदवारी अर्ज भरणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं ?
उत्तर : चित्तरंजन (कांचीपुरम)
प्रश्न : नोबेल पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोण?
उत्तर : मेरी क्युरी
प्रश्न : भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती कोण ?
उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे
धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे, (जन्म : 18 एप्रिल 1858; – 9 नोव्हेंबर 1962) यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले 104 वर्षांचे जीवन वाहिले. इ. स. 1907 साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.
प्रश्न : विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूंची नावे सांगू शकता का ?
उत्तर : ऑरविल राईट आणि विलबर राईट
प्रश्न : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू केलेला पहिला सहकारी साखर कारखाना कोणता ?
उत्तर : जिजाबाई सहकारी साखर कारखाना
प्रश्न : 10 लाखांची नोट चलनात देशाचं नाव काय आहे ?
उत्तर : व्हेनेझुएला Venezuela (Country in South America)
प्रश्न : भारताचा राष्ट्रध्वज कोणी बनवला ?
उत्तर : भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना लेफ्टनंट श्री पिंगली व्यंकय्या यांनी केली.
प्रश्न : परदेशात प्रथमच भारताचा झेंडा फडकवणारी महिला कोण होती ?
उत्तर : भारताचा पहिला तिरंगा (राष्ट्रध्वज) 46 वर्षीय पारशी महिला भिकाजी कामा रुस्तम कामा (मॅडम कामा) यांनी फडकवला होता. कामा यांनी ऑगस्ट 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ट येथे झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय काँग्रेस मध्ये भारताचा पहिला तिरंगा राष्ट्रध्वज फडकावला होता.
प्रश्न : फ्रिजपेक्षा माठातलं पाणी पिणं आरोग्यदायी का मानलं जातं ?
उत्तर : भांड्याच्या पाण्यात अल्कधर्मी (Alkaline) गुणधर्म असतात. त्यामुळे त्याचे ph मूल्य संतुलित राहतं. त्यामुळे अन्नपचन सुरळीत होतं. हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले आहे. त्यामुळे नेहमी माठातलं पाणी प्यावं.
प्रश्न : भारतातलं सर्वात श्रीमंत गाव कोणतं ?
उत्तर : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात माधापर हे गावं भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे. हे गाव बँक ठेवींच्या बाबतीत जगात सर्वात श्रीमंत आहे. या गावात 17 बँका असून सुमारे 7,600 घरे आहेत. आणि हो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या सर्व बँकांमध्ये 92 हजार लोकांचे 5 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा आहेत.
प्रश्न : आपल्या डोळ्यांमधलं पाणी (अश्रू ) नमकीन का असतं ?
उत्तर : आपण रडत असताना आपल्या डोळ्यांमधून अश्रू वाहतं. याची टेस्ट तुम्ही ही कधी केली असेल तर चवीला खारट (नमकीन) लागतं. जर आपण त्यांच्या घटकांबद्दल (Components) बोललो तर त्यात 98% पाणी असतं आणि उर्वरित 2% प्रथिने (Protein) आणि मीठ आयन (Salt ion) आढळतं. आता तुम्ही विचार कराल की, आपल्या डोळ्यांत क्षार नेमके येतात कुठून ?
तर आपलं शरीर हे इलेक्ट्रोलाइट्स आणि सॉल्ट (Salt ion) वापरून मेंदू आणि स्नायूंमध्ये आवश्यक वीज (Electricity) तयार करतं. आपल्या डोळ्यांत निर्माण होणारे अश्रू आपल्या पापण्यांखाली (Lacrimal gland ) आपल्या डोळ्यांत निर्माण होणारे अश्रू आपल्या पापण्यांखाली असलेल्या अश्रू ग्रंथीद्वारे( Lacrimal gland) तयार होतात आणि ते निर्माण होणाऱ्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स (Electrolytes) असतात. म्हणूनच आपले अश्रू खारट (नमकीन) आहेत.
प्रश्न : प्रेग्नंन्सी किटद्वारे स्त्री गर्भवती आहे की नाही हे कसं समजतं ?
उत्तर : मित्रांनो, विविध रहस्य उलगडणारी चमत्कारी मानली जाणारी शक्ती म्हणजे विज्ञान. म्हणून विज्ञान हे जादूपेक्षा कमी नाही असं मानलं जातं. मुळात हे किट महिलांच्या लघवीमध्ये असलेलं ह्यूमन क्रॉनिक गोनाडोट्रॉपिक हार्मोन (Human chronic gonadotropic) म्हणजेच एचसीजी (HCG) हार्मोन तपासण्याचे काम करतं.
जेव्हा एखादी व्यक्ती गर्भवती असते तेव्हाच हा एचसीजी (HCG) तयार होतं. जसा आपण लघवीचा थेंब टेस्ट ट्यूबमध्ये टाकल्याने लघवीमध्ये असलेले एचसीजी (HCG) हे मोबाईल अँटीबॉडीने बॅण्ड केलं जातं आणि पुढे टेस्ट लाइनवर येतं. या टेस्ट लाईन सोबतच एक एन्झाइम (Enzyme) देखील जे रंग बदलण्याचं काम करतं. याच्या मदतीने महिला गर्भवती आहे की नाही हे समजतं.
प्रश्न : भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण होती ?
उत्तर : कादंबिनी गांगुली या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. गांगुलीने 1886 मध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि पेनसिल्व्हेनियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. भारतातील राजेशाही निरक्षर असताना त्यांनी पदवी प्राप्त केली. आपल्या संघर्षाने त्यांनी इतिहासात आपलं नाव कोरलं.
प्रश्न : भारतातील सर्वात जास्त शिकलेली मराठी व्यक्ती कोण ?
उत्तर : भारतातील सर्वात जास्त शिकलेलया व्यक्तीचं नाव हे डॉ श्रीकांत जिचकर आहे. जिचकार यांचा जन्म 1954 मध्ये नागपूर येथील शेतकरी कुटुंबात झाला होता. अवघ्या 49 वर्षाच्या जीवनात 42 विद्यापीठं, 20 पदव्या आणि 28 सुवर्णपदकं असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला.
त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होत. त्यांनी 1978 साली यूपीएससीची परीक्षा दिली होती. डॉ जिचकार यांचा 2 जून 2004 रोजी नागपूरपासून 60 किमी अंतरावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.