शेतीशिवार टीम : 18 ऑगस्ट 2022 :- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना बंडखोर – भाजप सरकारकडून विधिमंडळात 25 हजार 826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यात महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी 4 हजार 700 कोटी तर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 300 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांवर चर्चा केल्यानंतर त्या मंजूर करण्यात येतील. मागील अर्थसंकल्पात संभाव्य आपत्तीचा विचार करून सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठीच्या हेक्टरी 13 हजार 600 रुपयांपोटी देण्यात येणाऱ्या निधीची मागणी करण्यात आलेली नाही.
गृहविभागासाठी तब्बल 1593 कोटी रुपयांची मागणी प्रस्तावित असून सहकार खात्यासाठी 5 हजार 145 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना आणली. या योजनेंर्तगत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोना काळात सरकारची आर्थिक कोंडी झाल्याने हा विषय मागे पडला होता.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे अनुदान वाटप करण्याची घोषणा केली. मात्र, यातील अनेक अटींमुळे शेतकरी वंचित होते. पश्चिम महाराष्ट्रात पूर, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळाली होती. या शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी नियमावली तयार केली अन् हे पश्चिम महाराष्ट्रालाही ॲड करण्यात आलं होतं. हे अनुदान वाटप करण्यासाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची मागणीला मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता या कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सणासुदीच्या दिवसांत म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात वितरित केला जाणार असल्याचे समजले आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार करून पात्र शेतकऱ्यांना 4700 कोटी रुपये निधी प्रोत्साहन अनुदान म्हणून वाटप केलं जाणार आहे.
खातेनिहाय मागण्या :-
गृह खाते :- 1593 कोटी
सहकार :- 5145 कोटी
महिला बालकल्याण :- 1672 कोटी
ग्रामविकास :- 1301 कोटी
अन्न नागरी पुरवठा :- 508 कोटी
नियोजन :- 500 कोटी
बहुजन कल्याण :- 295 कोटी
वैद्यकीय शिक्षण :- 235 कोटी
पर्यटन 551 कोटी
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अखेर 50,000 अनुदानाचा GR आला । पहा, तुम्हाला मिळणार का लाभ ; कोण पात्र, कोण अपात्र ? शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
One Response