25 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुकृपा लॉन या ठिकाणी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी आयोजित नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन उत्साहात पार पडली. या परीक्षेत विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे निवासी नायब तहसीलदार सौ.स्नेहा गिरी गोसावी, गंगा एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका कु. अमृतेश्वरी घावटे, समप्रभा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. धनंजय नाईक, विद्याधाम प्रशाला देवदैठण मुख्याध्यापक बाळासाहेब दहिफळे , दैनिक समर्थ भारत वृत्तसेवाचे पत्रकार चेतन पडवळ , शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे राजुद्दीन भाई सय्यद, या सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
823 विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी प्रतिभा भरत पुजारी यांना स्टार टीचर 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रत्येक विदयार्थ्याला योग्य मार्गदर्शन करून नॅशनल लेव्हल पर्यंत पोहोचवण्याची कामगिरी त्या नेहमीच करत असतात.
2023 मध्ये यांना गंगा एज्युकेशन सोसायटीकडून गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित कारण्यात आले.
2021 मध्ये पद्मश्री अण्णा हजारे यांच्या हस्ते स्टार टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2020 मध्ये एव्हरेस्ट अबॅकस बेस्ट टीचर देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी च्या संचलिका सौ . कल्पना घडेकर मॅडम तसेच एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीतील शिक्षिका रेश्मा कळमकर , सुवर्णा ठोकळ , वैशाली लोंढे , स्वाती बनकर , शितल जंबे , भारती भोसले, विद्या पवळे , मोहिनी चौधरी , प्रतिभा चेडे ,चैत्राली हारदे,ज्योती कोळसे…प्रणिता पाटील, अंकिता सानप ,प्रियांका शिंदे , माधुरी वेताळ, गायत्री साबळे ,पूजा चौधरी , .कदम,पडवळ आणि
सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल सर यांनी केले, तर आभार प्रणिता पाटील यांनी मानले.