मुंबईहुन आता मुंबई – पुणे एक्सप्रेसवे गाठता येणार फक्त 30 मिनिटांत! ‘या’ ठिकाणी होणार 6.5Km चा एलिव्हेटेड लिंक रोड..

0

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवरील चिर्ले ते कोणे जंक्शन या रस्त्याच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कार्यकारी समितीच्या बैठकीत या कामाचे कंत्राट निश्चित करण्यात आले असून, गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. महिनाभरातचं हे काम सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अटल सागरी सेतू मार्गे नवी मुंबईतील चिर्ले येथे आल्यास चिर्ले येथून राष्ट्रीय महामार्गाने पुण्याला जावे लागते. हा फरक खूप मोठा आहे. त्यामुळे चिर्ले येथून थेट मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी अटल सागरी सेतू मुंबई – पुणे एक्सप्रेस- वेला जोडण्याचा निर्णय MMRDA ने घेतला आहे. त्यानुसार चिर्ले ते कोन असा 6.5 किमीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर करण्यात येणार आहे. या रस्त्याचा 1.5 किमीचा भाग पूर्णपणे नवीन असणार आहे..

दरम्यान, या निविदेबाबत काही अतिरिक्त माहिती सादर करण्याचे निर्देश कार्यकारी समितीने दिले आहेत. त्यानुसार एक – दोन दिवसांत ही माहिती कार्यकारिणीकडे सुपूर्द केली जाणार आहे. यानंतर करारावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. एकंदरीतच करार निश्चित झाल्याने पुढील कार्यवाही होऊन महिनाभरात उन्नत रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

काम सुरू झाल्यापासून 30 महिन्यांत म्हणजे अडीच वर्षांत हे काम पूर्ण होईल. त्यामुळे अडीच वर्षांत अटल सेतूच्या माध्यमातून मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून 30-35 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू होत असल्याने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.

या रस्त्याच्या कामासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या होत्या. निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला. गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड, एल अँड टी, जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड आणि पीएनसी इन्फ्राटेक यांनी निविदा सादर केल्या होत्या. एमएमआरडीएच्या (MMRDA) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेडने निविदा जिंकली आहे. शुक्रवारी झालेल्या एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत निविदा मंजूर झाल्यानंतर हे कंत्राट गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेडला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.