पिठाची गिरणी व शिलाई मशीनसाठी अर्ज सुरु ! मिळतंय 90% पर्यंत अनुदान, पहा कागदपत्रे अन् PDF फॉर्म अर्ज प्रोसेस..

0

देशातील महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याच्या उद्देशाने महिला व बालकल्याण विभागामार्फत मोफत पिठाची गिरणी व शिलाई मशीन योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये महिलांनी त्यांच्या घरी पिठाच्या गिरणी व शिलाई मशीनद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा.

जिल्हा परिषद सेस फंड 2023 – 24 योजनेंतर्गत महिलांना नोंदणी केल्यावर शासनाकडून पिठाच्या गिरणीचे मशीन व शिलाई मशीन मोफत दिले जाणार आहे.

या 2 लाभांसाठी 90 टक्के अनुदान..

1. ग्रामिण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे .

2. ग्रामिण भागातील महिला व मुलींना पिक्को व फॉल मशिन पुरविणे

या योजनांशी संबंधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. सोबतच अर्जाचे प्रारूप जोडलेले आहे. अटी व शर्तीची पुर्तता करणारे पात्र अर्जच सादर करावी, प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेत व पडताळणी करून दि. 23/02/2024 रोजी अर्जासह विहीत नमुन्यातील soft copy व Hard Copy कार्यालयास सादर करावी.

आवश्यक कागदपत्रे :-

1. अर्जदार महिला 12 वी पास असावी. (12 वी)
2. आधार कार्ड
3. 8अ उतारा(घराचा)
4. विहित नमुन्यातील अर्ज
5. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा
6. बँक पासबुक
7. विज बिल

वरील कागदपत्रे जोडून आपण फ्री पिठाची गिरणी योजना व शिलाई मशीन (Free flour mill Scheme) योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा  

ज्या जिल्हा परिषदेसाठी महिलांना अर्ज करायचा आहे त्या महिलांनी आपल्या तालुकास्तरावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला भेट द्यावी..

Leave A Reply

Your email address will not be published.