मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी पुणे जिल्ह्यांत 12 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत 17 ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अभिलेख्यांची तपासणी करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील
यांच्या आंदोलनाचे update मिळवण्या साठी खालील व्हाट्सअप गृप जॉईन करा
येथे क्लिक करा
या तपासणीत आढळून आलेल्या कुणबी नोंदी संदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ द्यावेत असे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
कुणबी, मराठा – कुणबी, कुणबी- मराठा जातीचे प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी, खेड तहसीलदार यांच्याकडे निवेदन देत मागणी करण्यात आली होती. या शिबिरात कुणबी, मराठा कुणबी, कुणबी – मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी अर्जाचे नमुने वाटप करणे, अर्ज भरुन घेणे, अर्जाचे पुरावे घेणे, अर्जाची ऑनलाइन करणे आदी कामकाज केले जाणार आहे.
या शिबिरासाठी महसूल कर्मचारी व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आंदोलनाला यश आले.
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील
यांच्या आंदोलनाचे update मिळवण्या साठी खालील व्हाट्सअप गृप जॉईन करा
येथे क्लिक करा
मात्र, आता तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या शिबिरामध्ये मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घेण्यासाठी शासन पातळीवर शिबिराचे आयोजन केले आहे.
या ठिकाणी होणार शिबिर..
खेड तालुक्यात राजगुरुनगर (खांडगे लॉन्स), आंबोली (श्रीविठ्ठल मंदिर), चिखलगाव (जि.प. शाळा), येणवे (जि.प. शाळा), वेताळे (अस्मिता भवन ), वाडा (स्वामी समर्थ मंदिर) पाईट (सोमनाथ मंगल कार्यालय), कुरकुंडी (श्री भैरवनाथ मंदिर), पाळू (श्रीविठ्ठल मंदिर), कडूस (ग्रामपंचायत सभागृह), चांडोली (सर्कल कार्यालय) चाकण (नगर परिषद सभागृह), कुरुळी (वासल्य मंगल कार्यालय), कनेरसर (ग्रामपंचायत कार्यालय), भोसे (शांताई लॉन्स), करंज विहिरे (जि.प. शाळा), येलवडी (ग्रामपंचायत कार्यालय) या ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहे.
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील