पुणे शहर हे माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते, तर नाशिक हे कृषी उत्पादनांची मोठी बाजारपेठ आहे. अलीकडच्या काळात नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या स्थापन झाल्या आहेत. या दोन्ही शहरांमध्ये लघु, मध्यम आणि अवजड उद्योगांचे कारखाने, कृषी संस्थांचे मोठे जाळे आहे. परंतु या दोन शहरांचे अंतर पार करण्यासाठी महामार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी व वाहनचालक, कामगार, उद्योजक सारे रोजचं त्रस्त होत आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन पुण्याला समृद्धी महामार्गाने जोडण्यासाठी औद्योगिक महामार्गाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या दोन शहरांदरम्यान पुणे – नाशिक सेमी – हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पलाही मंजुरी देण्यात आली असून मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.
परंतु आता या प्रस्तावित नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात बदल करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नवीन मार्गात आता शिर्डीचा समावेश करण्यात येणार असून या बदलामुळे रेल्वेची प्रवासी संख्या वाढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
नाशिक – पुणे सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ आराखड्यानुसार, नाशिक – संगमनेर – पुणे असा 235 किमीचा मार्ग होता. प्रकल्पाची किंमत 16,000 कोटी रुपये होती. नवीन मार्गामुळे नाशिक – पुणे मार्गात 30 किमीची भर पडणार आहे. या मार्गावर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सेमी हायस्पीड असणार आहे.
या प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली होती. सुरुवातीच्या मार्गानुसार प्रकल्प राबविल्यास प्रकल्पाची किंमत लक्षणीयरीत्या वाढेल, कारण या मार्गासाठी खूप मोठ्या प्रमाणावर बोगद्याचे काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगिले होते. त्यामुळे आता या नव्या मार्गाने ही समस्या उद्भवणार नसल्याचं फडणवीस यांनी सांगितले.
या नव्या मार्गासह प्रकल्पाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे आहे. “केंद्रीय मंत्रिमंडळाने होकार दिल्यावर प्रकल्पाचे तपशील तयार केले जाणार आहे या मार्गावर 30 किमीचा अतिरिक्त प्रवास असला तरी प्रवासाचा कालावधी तसाच राहील.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा अर्थसंकल्प :-
या प्रकल्पासाठी 16,039 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि बांधकाम सुरू झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत 1,200 दिवस लागतील. संरेखनानुसार, 260.15 किमी रेल्वे मार्गावर 24 रेल्वे स्थानके बांधली जातील. पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकूर, आंबोर, संगमनेर..
पर्यंत सारखाच राहण्याची शक्यता आहे, परंतु पुढे शिर्डी असल्याने मार्गात बदल होणार असून नवीन रूट अलाइनमेंट आल्यानंतरच पुढील स्टेशन्सची माहिती मिळेल.
या आधी संगमनेरातून निमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर, मुहादरी, वडगाव आणि नाशिक ही स्थानके यादीत होती.
दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांपेक्षा कमी करण्याच्या प्रयत्नात ही योजना सुरू करण्यात आली होती. याशिवाय व्यापार, पर्यटन आणि धार्मिक प्रवासही वाढण्याची अपेक्षा आहे.