मुंबई एमएमआरच्या उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवेला गती देणाऱ्या पनवेल कर्जत लोकल कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे. मध्य रेल्वेच्या या पाचव्या लोकल कॉरिडॉरवर MRVC च्या माध्यमातून सर्वात लांब लोकल रेल्वे बोगदा देखील आकार घेत आहे. एक प्रकारे या दुहेरी मार्ग प्रकल्पांतर्गत 3 अत्याधुनिक बोगदे बांधले जात आहेत, ज्याचे बांधकाम अत्यंत अवघड मानले जात आहे.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प एमयूटीपी -3 अंतर्गत पनवेल – कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्प आकार घेत आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी प्रकल्पातील सर्वांत लांब बोगद्याच्या पी 1 आणि पी 2 या दोन्ही पोर्टल्सच्या उद्घाटनासह कामाला सुरुवात करण्यात आली होती. सद्यस्थितीत पनवेल – कर्जत नवीन उपनगरीय कॉरिडॉरमधील मुख्य बोगदा – २ ( वावरली बोगदा) चे 2 किमी भूमिगत खोदकाम पूर्ण झाले असून सध्या वॉटर प्रूफिंग आणि काँक्रीट अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले असून बीएलटी (बॅलास्ट लेस ट्रॅक) शी संबंधित तयारीची कामे प्रगतीपथावर असल्याचे एमआरव्हीसीद्वारे सांगण्यात आले.
एकूण 3144 मीटर लांबीचे तीन बोगदे या प्रकल्पात समाविष्ट आहेत. यामध्ये 219 मीटर लांबीचा मुख्य बोगदा- 1 (नघळ बोगदा), 2625 मीटर लांबीचा मुख्य बोगदा – 2 ( वावरेली बोगदा) आणि 3 मोटर लांबीचा बोगदा -3 (किरवली बोगदा) या प्रकल्पाचा भाग आहे.
यामध्ये नधळ बोगद्याचे काम 21 ऑक्टोबर रोजी सुरू झाले आणि 10 मे 2023 रोजी ब्रेकथ्रू प्राप्त झाला. 22 फेब्रुवारी 2023 रोजी 2625 मीटर लांबीचा मुख्य बोगदा- 2 वावरेली बोगद्याचे भूमिगत उत्खनन सुरू होऊन नुकतेच पूर्ण झाले आहे. तर बागदा -3 म्हणजेच किरवली बोगद्याच्या भूमिगत उत्खननाचे कामही 29 सप्टेंबर 2023 रोजी झाले.
2812 कोटींचा प्रकल्प..
उल्लेखनीय म्हणजे जानेवारी 2028 मध्ये मंजूर झालेल्या कर्जत-पनवेल लोकल प्रकल्पाचे काम भूसंपादन, कोरोनाचा कालावधी आणि इतर समस्यांमुळे बराच काळ रखडले होते. गेल्या दोन वर्षांत कामात बरीच प्रगती झाली आहे. प्रकल्प अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली एकूण 57.16 हेक्टर खाजगी जमीन 2 रेल्वे उड्डाणपूल आणि 3 बोगद्यांसह सर्व 70 GAD च्या मान्यतेने संपादित करण्यात आली. MRVC चे सीपीआरओ सुनील उदासी म्हणाले की, प्रकल्पाच्या एकूण कामांपैकी 46 टक्क्यांहून अधिक काम झाले आहे. 24 पुलांचे काम पूर्ण झाले असून 30 पुलांचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे बोर्डाने ठेवले आहे.
5 लोकल स्टेशन असणार ..
पनवेल – कर्जत उपनगरीय कॉरिडॉर, पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत दरम्यान 5 स्टेशन्स असतील. कॉरिडॉरवर 68 छोटे – मोठे पूल बांधले जात आहेत. MRVC नुसार 2 उड्डाणपूल, 8 मोठे आणि 36 छोटे पूल, 15 आरयूबी, 7 आरओबी आणि 3 बोगद्यांचे काम सुरू आहे. 5 स्टेशन्सचे (मोहोपे, चौक, कर्जत, चिखले आणि पनवेल स्थानके) सर्व ईएसपी मंजूर करण्यात आले आहेत.
30 ते 35 मिनिटांचा वाचणार वेळ..
सध्या लोकलमधून कर्जतला जाण्यासाठी मुख्य मार्गावरून कल्याण बदलापूरमार्गे जावे लागते. पनवेल ते कर्जत थेट लोकल सेवा सुरू झाल्यामुळे लाखो एमएमआर प्रवाशांना त्याचा फायदा होणार असून पनवेल, खालापूर आणि कर्जतजवळ नवीन निवासी क्षेत्रे विकसित होतील. पनवेल ते कर्जत हा नवीन लोकल कॉरिडॉर सुरू झाल्याने मुंबई ते कर्जत दरम्यानच्या लोकल प्रवासाच्या वेळेत सुमारे 30 ते 35 मिनिटांची बचत होणार आहे..