Take a fresh look at your lifestyle.

मुंबई – पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास महागणार, टोलमध्ये 18% वाढ ; पहा आता कार, बस, ट्रक, टॅक्सीला ‘इतकं’ असणार भाडे..

0

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील टोल 1 एप्रिलपासून 18% वाढणार असून यामुळे प्रवाशांचा खर्चात भर पडणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एमएसआरडीसी दरवर्षी एक्सप्रेसवेवरील टोलमध्ये 6% वाढ करते, परंतु ते दर तीन वर्षांनी एकाच वेळी लागू केले जाते.

2020 मध्ये वाढवण्यात आला टोल :-

पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवरील टोलमध्ये आता 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी 1 एप्रिल 2020 रोजी टोलमध्ये वाढ करण्यात आली होती. दर तीन वर्षांनी टोलवाढीबाबत अधिसूचना जारी केली जाते. त्यानुसार टोलमध्ये वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर टोल वाढल्याने आता प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. वैयक्तिक वाहन वापरकर्त्यांना 1 एप्रिलपासून 94 – किमी स्पीड कॉरिडॉरवर वन – वे टोल म्हणून 320 रुपये द्यावे लागणार आहे. तो आता सध्याचा दर 270 रुपये आहे. पुणे ते मुंबईच्या फोर्ट परिसरात प्रवास करण्यासाठी कार युजर्सना 360 रुपये टोल (एक्स्प्रेसवेवर 320 रुपये आणि वाशीजवळ 40 रुपये) खर्च करावा लागणार आहे.

खासगी बस आणि कॅबचे भाडे वाढणार !

टोल दरवाढीनंतर खासगी बस आणि कॅब मालक आता लवकरच प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करणार आहे. कारण पुणे बस आणि कार मालक संघटनेचे अध्यक्ष राजन जुनावणे म्हणाले की, टोल दरवाढीचा निश्चितच भाड्यावर परिणाम होईल. साथीच्या रोगामुळे वाहतूकदारांचे मोठे नुकसान झाले असून ते पुन्हा परवडणारे नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅक्सीचे दर 400 रुपयांपर्यंत वाढणार..

पुणे जिल्हा लक्झरी बस असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर यांनी भाडेवाढीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. टोल वाढल्यास आमचा परिचालन खर्चही वाढेल, असे ते म्हणाले. भाडे वाढणे अपेक्षित आहे. स्वराज्य वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष गुरू कट्टी यांनी सांगितले की, पुणे-मुंबई मार्गावर चार आसनी कारचे एकेरी भाडे टोलसह 2,800 रुपये आहे. सहा सीटरसाठी 3,600 रुपये आहे. एक्स्प्रेसवे टोल सुधारणेनंतर आम्ही सुमारे 300 ते 400 रुपयांची भाडेवाढ करण्याचा विचार करत आहोत.

सध्याचे आणि वाढलेले टोल दर जाणून घ्या..

चारचाकी वाहनांना पूर्वी 270 रुपये मोजावे लागत होते, आता 320 रुपये मोजावे लागणार आहेत. टेम्पोचा टोल 420 वरून 495 पर्यंत वाढेल. ट्रकसाठी 580 ऐवजी 685 रुपये तर बसला आता 797 रुपयांऐवजी 940 रुपये टोल भरावा लागणार आहे. तीन एक्सेलना 1380 रुपयांऐवजी 1630 रुपये टोल द्यावा लागणार आहे. एम एक्सेलचा टोल पूर्वी 1835 रुपये होता तर तो आता 2165 रुपये झाला आहे.

सरकारी बसच्या भाड्याबाबत चित्र अद्याप स्पष्ट नाही..

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने प्रवास करणार्‍या लोकांना त्यांच्या खिशावर ताण पाडण्याची शक्यता नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, भाडेवाढीचा निर्णय मुंबईतील मुख्यालयातून घेतला जातो. आम्हाला अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. एक्स्प्रेसवे टोलमध्ये 18% वाढीचा प्रवाशांनी निषेध केला. दोन शहरांमध्ये वारंवार ये-जा करणारे कौशल प्रधान म्हणाले की, हा मार्ग असुरक्षित बनला आहे, त्यामुळे टोल वाढवणे योग्य नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.