10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! मोफत टॅबसह रोज 6GB इंटरनेट डाटा फ्री मिळणार, पहा कागदपत्रे अन् ऑनलाईन अर्ज प्रोसेस..
देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी तसेच तरुणांसाठी अनेक फायदेशीर योजना राबविल्या जात आहेत. या क्रमवारीत, विद्यार्थ्यांना टॅबलेटआणि अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन मोफत वाटण्याच्या योजनेचाही समावेश महाराष्ट्र राज्य सरकारने केला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT – CET / JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहे.
महाज्योती मार्फत MHT – CET / JEE / NEET परिक्षा पुर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येत आहे.
योजनेच्या लाभासाठी पात्रता :-
1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा / असावा.
3. उमेदवार हा नॉन – क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांना अर्ज करताना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. 9 वी ची गुणपत्रिका
2. 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
3. आधार कार्ड
4. रहिवासी दाखला
5. जातीचे प्रमाणपत्र
6. वैध नॉन – क्रिमिलेअर प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा ?
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन MHT-CET/JEE / NEET 2025 परीक्षेच्या MHT-CET / JEE / NEET 2025 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन पुर्व तयारीसाठी OBC / VJNT / SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सर्वप्रथम महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील ” Application for MHT- CET / JEE / NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
अर्जासोबत वर नमूद केलेले कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
महाज्योती ऑनलाईन अर्ज – अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा..
अर्ज करण्याचा अंतिम दि. 31/03/2023 आहे.
पोस्टाने किवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre संपर्क करावा संपर्क क्र – 0712-2870120/21 (E-mail Id : mahajyotijeeneet24@gmail.com)
10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्याकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE/NEET या परिक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.