प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि प्रवाशांची मागणीची दखल घेत मुंबई – पुणे – हैद्राबाद ही विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे लातूरहुन सोडण्यात आली असुन मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन मध्यरात्री 12.30 वाजता पहिली रेल्वेगाडी धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापुर विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या संदर्भात मध्य रेल्वेच्या सोलापुर विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिध्दि पत्रकात म्हटले आहे की, प्रवाशांची मागणी आणि अतिरिक्त गर्दी, लक्षात घेत मुंबई – पुणे – हैद्राबाद (गाडी क्र. 01137/01138 ) ही विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेगाडी धावणार आहे.
ही रेल्वे लातूर रेल्वेस्थानकात रात्री 11.50 वाजता तर हैद्रबाद येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 06.30 वाजता पोहचणार आहे. तर मुंबईकडे जाताना ही रेल्वे लातूर रेल्वेस्थानकात पहाटे 3.50 वा. पोहचणार आहे.
या रेल्वेचा अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे आहे : –
गाडी क्र. 01137 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हैदराबाद विशेष एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाहून रविवारी (दि. 10 मे) रात्री 12.30 वा. सुटणार आहे.
पुढे दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड (आगमन 6 वा. प्रस्थान 6.03 वा.), कुडुवाडी (आगमन 07.35, प्रस्थान 07.40) बाशी टाउन (आगमन 08.30 प्रस्थान 08.32). धाराशिव (आगमन 9.00 प्रस्थान 9.02), लातूर (आगमन 11.50, प्रस्थान 11.55), लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, लिगमपल्ली, बेगमपेठ, हैदराबादला (बुधवारी) संध्याकाळी 6.30 वा. पोहचणार आहे.
गाडी क्र. 01138 : हेदराबाद – पुणे विशेष एक्स्प्रेस हैद्राबाद स्थानकाहून रविवारी (दि.10) रात्री 8 वाजता सुटणार आहे.
पुढे बेगमपेठ, लिंगमपल्ली, विकाराबाद, जाहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर (आगमन 3.50, प्रस्थान 3.55), धारशिव आगमन 5.08, प्रस्थान 5.10), बार्शी टाउन (आगमन 6.03. प्रस्थान 06.05), कुईवाडी (आगमन 7.25, प्रस्थान 7.30), दौंड (आगमन 10, प्रस्थान 10.03), पुण्याला (सोमवार) रात्री 12.05 वा. पोहचणार आहे. या रेल्वेतील डब्यांची संरचना : गार्ड कम लगेज – 2 , जनरल -11, चेअर कार 3 , एसी – 1 एकूण 14 कोच असणार आहेत.