राज्यातील शेतकरी दरवर्षी या ना त्या कारणाने मोठ्या आर्थिक संकटात सापडत असतो. कधी अवर्षण तर अतिवृष्टी, त्यातच दुष्काळ शिवाय शेतीमालाला कमी भाव तर अधूनमधून अवकाळीचा मारा. या सर्व संकटांना तोंड देता देता शेतकरी पुरता जेरीस येतो.

अशा शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यंदा सुरू होणार आहे.

त्यातून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत.

मे अखेरीस राज्याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आयकरदाते, सरकारी नोकदार, लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसरीकडे, 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील. मात्र, पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे.

लाखो शेतकऱ्यांचे खाते नाही लिंक..

सध्या राज्यातील 12 लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी त्वरित त्यांचे बँक खाते आधार व फोन नंबरशी लिंक करून घ्यावे; अन्यथा त्यांना राज्य सरकारच्या योजनेच्या पैयापासून शेतकऱ्यांना मुकावे लागेल. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्य सरकारने केंद्राकडूनही राज्यातील शेतकरी लाभार्थीची माहिती मागविली आहे. केंद्र सरकारचा चौदावा हप्ता व राज्य सरकारचा पहिला हप्ता आता मे अखेरीस शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात जवळपास 83 लाख लाभार्थी आहेत. वार्षिक एक हजार 660 कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

तरच मिळेल हप्ता..

किसान पीएम योजनेतील लाभार्थीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’साठी पात्र असतील. ज्या शेतकरी लाभार्थींनी त्यांचे आधार बैंक खात्याशी संलग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ करून घ्यावे. मेअखेरीस योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या अटी असणार बंधनकारक..

यासाठी काही निकष असून शेतकरी महासन्मान निधी मिळविण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र असेल,

सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागेल.

लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी.

बैंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक असणार आहे.

या सर्व बाबी पूर्ण असतील असेच शेतकरी लाभदायी ठरतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *