Take a fresh look at your lifestyle.

Mumbai Pune Expressway : नव्या मुंबई – पुणे एक्सप्रेसवे सह आता जुन्या महामार्गावरही वाढवला टोल, पहा नवे टोल दर..

0

1 एप्रिलपासून पुणे ते मुंबई रस्त्याने प्रवास करणं महागणार आहे. नव्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल टॅक्समध्ये वाढ करण्यासोबतच आता जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरील टोलमध्येही वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने घेतला आहे. वाढलेले दर पुढील तीन वर्षांसाठी वसूल करण्याचे आदेश मंडळाने दिले आहे.

एक्सप्रेस – वे टोलमध्ये 18% वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. भरमसाठ टोल टॅक्स टाळण्यासाठी अनेक वाहनधारक द्रुतगती मार्गाऐवजी वळणदार घाट असलेल्या जुन्या मुंबई – पुणे महामार्गाचा वापर करत आहेत. 1 एप्रिलपासून येथील टोल टॅक्समध्ये 18% वाढ करण्याचा प्रस्ताव बोर्डाने मंजूर केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका बसणाऱ्या वाहनचालकांसाठी हा निर्णय घातक ठरणार आहे.

14 मार्च रोजी महामार्गावरील सोमटणे टोलनाक्यावर टोल दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ नागरिक व वाहनचालकांनी आंदोलन केले. त्यानंतर शासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, दोन आठवड्यांनंतर सरकारने नव्या द्रुतगती महामार्गासह जुन्या महामार्गाचे टोल दर वाढवले ​​आहेत.

3 वर्षाचा टोल एकदमचं वाढला..

1 एप्रिलपासून मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये 18% वाढ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका वरिष्ठ MSRDC अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, 9 ऑगस्ट 2004 रोजीच्या सरकारी अधिसूचनेनुसार, टोल दरवर्षी सहा टक्क्यांनी वाढतो, दर तीन वर्षांनी एकूण 18 टक्क्यांवर पोहोचतो.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, या वाढीमुळे कार आणि जीपसारख्या चारचाकी वाहनांचा टोल 270 रुपयांवरून 320 रुपये आणि मिनीबस आणि टेम्पोसारख्या वाहनांसाठी हा दर 420 रुपयांवरून 495 रुपयांपर्यंत वाढला आहे.

मोठ्या श्रेणीतील दोन – एक्सल ट्रकचा टोल 585 रुपयांवरून 685 रुपये होईल, तर बससाठी 797 रुपयांवरून 940 रुपये होईल. त्याच वेळी, तीन – एक्सल ट्रकसाठी टोल 1,380 रुपयांवरून 1,630 रुपये, मल्टी-एक्सल ट्रक आणि मशिनरी – वाहनांसाठी 1,835 रुपयांवरून 2,165 रुपयांपर्यंत वाढणार आहे.

सहा पदरी मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग, सुमारे 95 किलोमीटर लांबीचा, 2002 मध्ये वाहनांसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला. दररोज सुमारे दीड लाख लोक एक्स्प्रेस वेचा वापर करत आहे.

जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरील वाढवण्यात आलेला टोल..

कार : पूर्वी 135 रुपये मोजावे लागत होते, आता 165 रुपये द्यावे लागतील.

हलकी वाहने : पूर्वी 240 टोल आकारला जात होता, आता 277 टोल आकारला जाईल.

ट्रक आणि बस : पूर्वी 476 टोल होता, आता 551 टोल भरावा लागणार आहे.

अवजड वाहन : पूर्वी 1023 रुपये टोल होता, आता 1184 टोल भरावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.