Take a fresh look at your lifestyle.

मुंबईकरांसाठी खुशखबर ! आता मुंबई ते नवी मुंबई गाठता येणार फक्त 10 मिनिटांत; ईस्टर्न फ्री वेला जोडला जाणार ग्रँट रोड, पहा रोडमॅप..

0

मुंबई मधील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी अनेक रस्ते आणि पूल बांधण्याचे काम तेजीत सुरू आहे. यातच आता बीएमसीने ईस्टर्न फ्रीवेच्या उत्तरेकडील ऑरेंज गेट ते ग्रँट रोड दरम्यान एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची योजना आखली आहे.

त्यामुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेत मोठी कपात होणार आहे. सुमारे 5.5 किलोमीटरच्या या प्रस्तावित एलिव्हेटेड रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2500 कोटी रुपये खर्च केले जाणार अशी चर्चा आहे.

मुंबईतील रस्त्यांच्या परिस्थितीवर भाष्य करताना बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या मुंबईच्या पूर्व उपनगरांना चेंबूर, घाटकोपरला जोडण्यासाठी फ्रीवेचा वापर केला जातो. हा फ्रीवे दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेटपर्यंत जातो.

यामुळे ठाणे आणि नवी मुंबईहून येणाऱ्या गाड्यांना जलद रित्या पोहचण्यास मदत होते. तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी येथे फ्रीवेला जोडला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईहून नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी गाठणे सोपे होईल.

तीन वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार..

ग्रँट रोड ते इस्टर्न फ्रीवे (ऑरेंज गेट) पर्यंतचे अंतर 5.56 किमी आहे. मात्र हे अंतर पार करण्यासाठी सध्या 30 ते 50 मिनिटे लागतात. एलिव्हेटेड रस्त्याच्या बांधकामामुळे हे अंतर केवळ 6 ते 7 मिनिटांत पार करता येणार आहे. ग्रँट रोड, नाना चौक, नॅपन्सी रोड, तारदेव, मुंबई सेंट्रल परिसरही थेट एमएमआरशी जोडले जाईलच पण सोबतच शिवडी-वरळी लिंक रोड आणि ऑरेंज गेट ते कोस्टल रोड मुळे मुंबईतील दक्षिण भागाला तीन वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी मिळणार आहेत. यामुळे या भागातील वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा निघणार आहे.

 

एलिव्हेटेड रस्त्याची गरज ?

ईस्टर्न फ्रीवे अर्थातच ऑरेंज गेट पासून सुरू होणारा एलिव्हेटेड रस्ता आणि पुढे जे. राठोड मार्ग – हँकॉक ब्रिज – रामचंद्र भट्ट मार्ग जो जे.जे. फ्लायओव्हरच्या वर आहे तेथून – एम.एस. अली रोड आणि शेवटी फ्रेरे ब्रिज पूर्व आणि पठ्ठे बापूराव मार्ग देना टॉकीज मार्ग (ग्रँट रोड) पर्यंत असणार आहे. या भागात दोन ते तीन पदरी एलिव्हेटेड रस्त्याची गरज असल्याचे येथे झालेल्या वाहतूक अभ्यासातून समोर आले आहे.

या मार्गावर दररोज 23,000 हून अधिक वाहनांची वाहतूक सुरु असते. या एलिव्हेटेड कॉरिडॉरची रुंदी 5.5 मीटर पासून 10.5 मीटर पर्यंत असू शकते. आरसीसी पाइल, पाइल कॅप, पीअर, पीअर कॅप तयार करताना विशेष प्रकारचे स्टील वापरण्यात येणार आहे. हे स्टील प्लेट गर्डरचे बनलेले असते, यामुळे भविष्यात ते गंजणार नाही आणि रास्ता जास्त काळ वाहतूक सेवा देऊ शकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.