Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांचा वाईट काळ सुरूच..! आता कापसानंतर तुरीची बारी, भारतात 10 लाख टन तूर होणार आयात, पहा आजचे तूर बाजारभाव..

0

देशात यंदा तुरीची लागवड कमी झाली. तसेच पाऊस आणि मररोगामुळं देशातील तूर उत्पादनात देखील मोठी घाट झाल्याचे समोर आले होते. देशातील गुलबर्ग भागात खराब हवामान आणि रोगामुळे तूर डाळ उत्पादनात मोठी कमतरता आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना तुरीला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे शेतकऱयांच्या या आनंदावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे.

तुरीच्या दरातील तेजी पाहून सरकारने शेतकऱ्यांच्या नफ्या ऐवजी आयातीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यंदा तर सरकार विक्रमी तूर आयात करणार आहे असे दिसत आहे. येणाऱ्या संभाव्य टंचाईच्या भीतीने, सरकारने देशांतर्गत गरज भागविण्यासाठी यावर्षी खाजगी व्यापाराद्वारे सुमारे 10 लाख टन उच्च दर्जाची तूर डाळ आयात करण्याची आगाऊ योजना आखल्याचे स्पष्ट केले आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या, विशेषतः डाळी आणि कांद्याच्या किमतींचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांनी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत या विषयावर चर्चा देखील करण्यात आली.

कृषी मंत्रालयाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 2022-23 या चालू पीक वर्षात तूर उत्पादन 3.89 दशलक्ष टन इतके कमी आहे, जे मागील वर्षी 4.34 दशलक्ष टन होते. तूर हे खरीप पीक असल्याने त्याच्या उत्पादनात नेहमीच चढ उत्तर चालूच असतात.

आयातीद्वारे तुरीची कमतरता भरून काढण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे,” असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी पत्रकारांना सांगितले. 2021-22 मध्ये सुमारे 7.6 लाख टन तूर आयात करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.

सचिव म्हणाले की येणाऱ्या परिस्थीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने सरकारने आगाऊ योजना तयार केली आहे आणि तूर डाळ आयात करण्यासाठी आधीच खाजगी व्यापाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. त्यानुसार डिसेंबर 2022 मध्ये सुमारे 2 लाख टन तूर डाळ आयात करण्यात आली आहे.

भारतात तूर डाळ ही पूर्व आफ्रिकन देशांमधून आणि म्यानमारमधून सर्वाधिक आयात केली जाते. या देशांमध्ये सुमारे 11-12 लाख टन तूर उपलब्ध असल्याचा अंदाज असल्याने भारत आवश्यक असलेली तूर डाळ याठिकाणावरून आयात करू शकेल, असे ते म्हणाले.

सरकार डाळींची आयात सुलभ व्हावी यासाठी व फ्युमिगेशन आणि फायटोसॅनिटरी मानदंड सुलभ करण्यासाठी काम करत आहे. आधीच 31 मार्च 2024 पर्यंत तूर डाळ आयात खुल्या सर्वसाधारण परवान्याखाली आणली गेली आहे, असेही ते म्हणाले. कांद्याच्या बाबतीत सचिव म्हणाले की, सध्या भाव स्थिर आहेत. सरकार येत्या काही महिन्यांत रब्बी पिकातून कांदा खरेदी करेल.

पहा आजचे तूर बाजारभाव..

शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/01/2023
शहादा क्विंटल 28 4700 6600 6291
दोंडाईचा क्विंटल 66 5500 6711 6170
पैठण क्विंटल 115 5560 6565 6491
भोकर क्विंटल 229 5500 6500 6000
कारंजा क्विंटल 2300 5905 7270 6600
कुर्डवाडी क्विंटल 16 6001 6850 6430
राहता क्विंटल 1 6300 6300 6300
हिंगोली गज्जर क्विंटल 550 6835 7350 7092
गेवराई काळी क्विंटल 1 6101 6101 6101
मंठा काळी क्विंटल 2 6000 6000 6000
सोलापूर लाल क्विंटल 71 6000 6825 6500
लातूर लाल क्विंटल 3295 6600 7301 7200
अकोला लाल क्विंटल 1716 5800 7445 6700
अमरावती लाल क्विंटल 1620 6100 6850 6475
धुळे लाल क्विंटल 44 5895 6400 6240
जळगाव लाल क्विंटल 24 6600 6705 6600
परभणी लाल क्विंटल 70 6000 6400 6100
चिखली लाल क्विंटल 915 5700 6850 6275
नागपूर लाल क्विंटल 1042 6400 7200 7000
नंदूरबार लाल क्विंटल 3 6100 6630 6350
अक्कलकोट लाल क्विंटल 350 6600 7100 6900
वाशीम लाल क्विंटल 1800 6200 7100 6500
अमळनेर लाल क्विंटल 200 6200 6551 6551
हिंगोली- खानेगाव नाका लाल क्विंटल 112 6400 6800 6600
मुर्तीजापूर लाल क्विंटल 1000 6520 7000 6805
सावनेर लाल क्विंटल 421 5900 6760 6500
परतूर लाल क्विंटल 108 6700 6750 6725
गंगाखेड लाल क्विंटल 4 6900 7000 6900
चांदूर बझार लाल क्विंटल 315 5122 7000 6600
मेहकर लाल क्विंटल 640 5500 6825 6400
मंठा लाल क्विंटल 66 5500 6651 6500
चाकूर लाल क्विंटल 47 6200 6921 6754
तुळजापूर लाल क्विंटल 15 6500 7000 6800
सेनगाव लाल क्विंटल 190 6400 6850 6500
पालम लाल क्विंटल 52 6900 7050 6950
पांढरकवडा लाल क्विंटल 300 6500 6700 6600
आष्टी- कारंजा लाल क्विंटल 42 6200 6700 6450
सिंदी(सेलू) लाल क्विंटल 189 6600 6900 6800
देवळा लाल क्विंटल 10 5205 6440 6030
जळकोट लाल क्विंटल 224 6850 7250 7050
दुधणी लाल क्विंटल 1137 6200 7150 6650
वर्धा लोकल क्विंटल 45 6010 6875 6550
अहमहपूर लोकल क्विंटल 240 6500 6791 6645
परांडा लोकल क्विंटल 12 6300 6700 6600
काटोल लोकल क्विंटल 205 6150 6811 6450
देगलूर पांढरा क्विंटल 208 6101 6950 6525
नंदूरबार पांढरा क्विंटल 3 6500 6776 6625
बीड पांढरा क्विंटल 227 5790 7000 6578
शेवगाव पांढरा क्विंटल 210 6500 6550 6550
शेवगाव – भोदेगाव पांढरा क्विंटल 10 6500 6500 6500
गेवराई पांढरा क्विंटल 555 6200 6752 6475
परतूर पांढरा क्विंटल 162 6700 6800 6726
देउळगाव राजा पांढरा क्विंटल 125 5811 6950 6500
केज पांढरा क्विंटल 73 6700 6900 6800
मंठा पांढरा क्विंटल 27 6000 6611 6450
तुळजापूर पांढरा क्विंटल 12 6500 6800 6750
आष्टी-जालना पांढरा क्विंटल 18 6300 6591 6550
Leave A Reply

Your email address will not be published.