Take a fresh look at your lifestyle.

पोकरा योजना 2022 । शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; राज्य शासनाकडून अनुदान खात्यात जमा । ऑनलाईन पहा, लाभार्थ्या यादी….

0

शेतीशिवार टीम, 15 जून 2022 : – नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पोकारा योजनेच्या (Pocra yojna 2022) अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एका अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी बातमी आहे.

पोकरा योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाचे वितरण 14 जून 2022 पासून करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि या संदर्भातील लाभार्थी याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. काय आहे ही पोकरा योजना ? कागदपत्रे / पात्रता / अनुदान / लाभार्थी याद्या कशा पाहायच्या या बाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेउयात…

या योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या योजनांकरता / बाबींकरीता बरेच लाभार्थी पात्र झाले होते, मात्र निधीच्या कमतरतेमुळे या योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नव्हते, त्यामुळे प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता या निधीचं वाटप सुरु झालं आहे,

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खो-यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. 4000 कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये आर्थिक वर्ष 2022 – 23 मध्ये पूर्ण झालेल्या कामांच्या बाबींची देयके अदा करण्याकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांचेकडून संदर्भ क्रमांक 2 च्या पत्रांन्वये प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यानुसार सन 2022 – 23 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून रु. 265.54 कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्मी कंपोस्ट युनिट तुषार सिंचन प्रकल्प, ठिबक सिंचन प्रकल्प बीजोत्पादन युनिट फॉर्म पॉन्ड्स लाइनिंग पाण्याचे पंप वृक्ष लागवड प्रकल्पांतर्गत फलोत्पादन तलाव, फार्म शेळीपालन युनिटचे ऑपरेशन, लहान प्राण्यांशी संबंधित प्रकल्पांसाठी अनुदान दिलं जातं…

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना महाराष्ट्र 2022 चे लाभ :-

महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी या कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांची संख्या वाढविण्याकडे लक्ष दिले जाणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना महाराष्ट्र 2022 साठी, राज्य सरकारने 4000 कोटी रुपयांचे बजेट सुरू केलं आहे.

शेतकऱ्यांना सहज शेती करता यावी यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार दुष्काळी भाग दुष्काळमुक्त करणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022 सुरू करण्यासाठी सरकारने जागतिक बँकेकडून सुमारे 2800 कोटी रुपयांची मदत कर्जाच्या स्वरूपात घेतली आहे.

महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत मातीच्या गुणवत्तेची प्रथम चाचणी केली जाणार असून त्याआधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतीवर लक्ष केंद्रित करून त्यांचे उत्पन्न वाढवता येणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022 पात्रता :-

या योजनेत फक्त महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी अर्ज करू शकतात.
योजनेंतर्गत फक्त लहान आणि मध्यम शेतकरीच पात्र मानले जातील.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी केवळ महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकरीच अर्ज करू शकतील.

आवश्यक कागदपत्रे :-

महाराष्ट्र राज्यातील कोणताही शेतकरी ज्याला या योजनेअंतर्गत अर्ज करून योजनेचा लाभ मिळवायचा आहे. त्या सर्वांसाठी खाली दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

आधार कार्ड
मोबाईल नंबर
मतदार ओळखपत्र
पासपोर्ट फोटो
निवास प्रमाणपत्र
बँक खाते डिटेल्स

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022 ऑनलाईन अर्ज कसा कराल ?

जर तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana ) घरबसल्या अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या टेप्स फॉलो कराव्या लागतील…

सर्वप्रथम अर्जदाराला योजनेच्या Official Website ला भेट द्यावी लागेल.

वेबसाइटला भेट दिल्यानंतर, वेबसाइटचे होमपेज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर उघडेल.

यानंतर तुम्हाला या पेजवर Application Form PDF चा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जाचा PDF डाउनलोड डाउनलोड करावा लागेल.

डाउनलोड केल्यानंतर, अर्ज तुमच्यासमोर उघडेल, त्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये तुमचे नाव, मोबाइल नंबर आणि आधार क्रमांक आणि सर्व आवश्यक माहिती टाकावी लागेल.

आता तुम्ही प्रविष्ट केलेली माहिती तपासल्यानंतर, तुम्हाला या फॉर्मसोबत विचारलेली सर्व कागदपत्रे जोडून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावी लागेल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना लाभार्थी यादी पाहण्याची प्रोसेस पहा…

येथे प्रथम तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या आधिकारिक वेबसाइट वर जावे लागेल.

अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होमपेज आपल्या समोर उघडेल.

होमपेजवर, तुम्हाला प्रगती अहवाल’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर, प्रकल्पांतर्गत गावनिहाय – गाव माहितीपत्रक, नकाशे(Base Map, LULC Map, WTP Map), लाभार्थ्यांची यादी यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्हा / तालुका गाव  निवडावे लागेल.

तुम्ही तुमचा जिल्हा निवडताच, तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित होईल…

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत समाविष्ट गावांची यादी…  

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत समाविष्ट गावांची यादी पाहण्याची प्रोसेस पहा…

राज्य सरकारने सुरू केलेल्या या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आधिकारिक वेबसाइट वर जावे लागेल.

दिलेल्या लिंकवर क्लिक करताच तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर होम पेज उघडेल.

होमपेजवर, तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रोजेक्ट लिस्ट ऑफ 5142 विलेज  पर्यायावर क्लिक करावं लागेल.

या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर PDF स्वरूपात एक फाईल उघडेल.

आता तुमच्या समोर असलेल्या या फाईलमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत येणाऱ्या गावांची यादी असेल.

प्रगती अहवाल पाहण्याची प्रोसेस :-

सर्वप्रथम तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या आधिकारिक वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

होम पेजवर तुम्हाला  प्रोग्रेस रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

या पेजवरील तुमच्या गरजेनुसार तुम्हाला लिंकवर क्लिक करावे लागेल.

तुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर संबंधित माहिती प्रदर्शित होईल.

निविदा डाउनलोड प्रोसेस :-

येथे प्रथम तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या आधिकारिक वेबसाइट वर जावे लागेल.

अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होमपेज आपल्या समोर उघडेल.

होम पेजवर तुम्हाला  ” टेंडर “ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या समोर एक यादी उघडेल.

यादीतील तुमच्या गरजेनुसार तुम्हाला लिंकवर क्लिक करावे लागेल.

लिंकवर क्लिक करताच संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसून येईल.

प्रकल्पाशी संबंधित विविध पुस्तिका डाउनलोड करण्याची प्रोसेस :-

सर्वप्रथम तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या Official Website वर जावे लागेल.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

होम पेजवर तुम्हाला  वेरियस बुकलेट्स ऑफ द प्रोजेक्ट  च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर संबंधित माहिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर येईल.

हवामान सल्ला पाहण्यासाठी प्रोसेस :-

येथे प्रथम तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या Official Website वर जावं लागेल.

अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होमपेज आपल्या समोर उघडेल.

होमपेजवर, तुम्हाला  ” वेदर एडवाइज “ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला तारीख निवडावी लागेल.

यानंतर तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर संबंधित माहिती दिसेल.

संपर्क कसा साधाल….

या योजनेंतर्गत शेतकरी बांधवांना या योजनेसाठी अर्ज करताना किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी काही अडचण असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर व ईमेल आयडीवर मेल करून तुमची समस्या सोडवू शकता…

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग :-
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA),
30 A/B, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफपेरेड, मुंबई 400005.
फोन नंबर : 022-22163351
ईमेल आयडी: pmu@mahapocra.gov.in

 

Leave A Reply

Your email address will not be published.