New Wage Code : एकूण CTC च्या 70.4% पगार येणार हातात, 6.6% होणार टॅक्स कपात; वर्षाला ₹ 3 लाख जमा होणार रिटायरमेंट फंड, पहा
हातात येणारा पगार कमी होणार, बेसिकच्या 50% झाल्यास टॅक्स जास्त कापला जाईल, भत्त्याचे पैसे कमी होतील. नवीन वेतन संहितेचा (New Wage Code) विचार करता अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. अद्याप याची अंमलबजावणी झाली तर नाही. परंतु, प्राथमिक माहितीच्या आधारे यामुळे नोकरी करणाऱ्यांच्या बजेटवर परिणाम होणार असल्याचे मानलं जात आहे.
नवीन वेतन संहिता लागू होण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून याची जोरात चर्चा सुरू आहे. याबाबत 30 राज्यांची संमती भेटली असून लवकरच अंमलबजावणी होणार आहे. असं झाल्यानंतर तुमच्या पगारासह, रोजच्या जीवनात खूप काही बदल होणार हे निश्चित. पण, कसा हे समजून घेणं गरजेचं आहे.
काय आहे न्यू वेज (New Wage) सॅलरी बाबत गोंधळ ?
केंद्र सरकारने 29 कामगार कायदे (labour law) जोडून 4 नवीन कामगार संहिता (new labour codes) तयार केल्या आहेत. त्यांना नवीन वेतन संहिता असे (New Wage Code) नाव देण्यात आलं आहे. वेतन संहितेत अशी तरतूद आहे की, कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांना जो पगार देतील, त्यात मूळ पगाराचा वाटा एकूण पगाराच्या (CTC) 50% असेल. सध्या, मूळ वेतन 30-35% दरम्यान आहे. सध्याच्या रचनेत रीइंबर्समेंट (अलाउंस) चा भाग अधिक आहे. यात रजा प्रवास भत्ता (LTA), ओव्हरटाइम आणि कन्व्हेयन्स भत्ता यांसारखे भत्ते आहेत.
तुमच्या पगाराचे स्ट्रक्चर कसे असणार समजून घ्या ?
समजा नोकरी करणार्या कर्मचार्याचे मासिक CTC (कॉस्ट टू कंपनी) रुपये 1.5 लाख आहे, म्हणजे 18 लाखांचे वार्षिक पॅकेज आणि तुम्ही कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर 1.50 लाख रुपयांची कमाल टॅक्स सूट घेऊ शकता. जर कंपनी तुम्हाला कलम 80CCD(2) अंतर्गत नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) चा लाभ देत असेल, तर नियमांनुसार, मूळ पगाराच्या 10% NPS मध्ये जातात आणि ते टॅक्समुक्त असते.
कसे असते सॅलरी स्ट्रक्चर ?
सध्याच्या वेतन रचनेत, मूळ वेतन CTC च्या 32% आहे. या अर्थाने, 1.50 लाखांच्या मासिक CTC मध्ये, मूळ वेतन 48,000 रुपये असेल. मग 50% म्हणजे रु. 24,000 HRA मध्ये, तर NPS मध्ये 10% बेसिक (रु. 48,000) म्हणजे रु. 4,800 जातील. जर मूळ वेतनाच्या 12% भविष्य निर्वाह निधी (PF) मध्ये गेल्यास 5,760 रुपये दरमहा EPF मध्ये जातील. अशाप्रकारे तुमचे 1.50 लाख रुपयांचे मासिक CTC 82,560 रुपये झाले आहे. म्हणजे उर्वरित 67,440 रुपये इतर घटकांद्वारे दिले जाते. यामध्ये विशेष भत्ता, इंधन आणि वाहतूक, फोन, वर्तमानपत्र आणि पुस्तके, वार्षिक बोनसमधील मासिक हिस्सा, ग्रॅच्युइटी या घटकांचा समावेश आहे.
सध्याच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये कशाचा किती वाटा…
पगार | महिना | वार्षिक |
बेसिक सॅलरी | 48,000 रुपये | 5,76,000 रुपये |
HRA | 24,000 रुपये | 2,88,000 रुपये |
स्पेशल अलाउंस | 37,636 रुपये | 4,51,632 रुपये |
PF कंट्रीब्यूशन | 5,760 रुपये | 69,120 रुपये |
NPS कंट्रीब्यूशन | 4,800 रुपये | 57,600 रुपये |
फ्यूल अँड ट्रांसपोर्ट | 16,000 रुपये | 1,92,000 रुपये |
फोन | 2,000 रुपये | 24,000 रुपये |
वर्तमानपत्रे -पुस्तके | 1,500 रुपये | 18,000 रुपये |
बोनस (वार्षिक) | 8,000 रुपये | 96,000 रुपये |
ग्रॅज्युएटी | 2,304 रुपये | 27,648 रुपये |
एकूण सॅलरी | 1,50,000 रुपये | 18,00,000 रुपये |
न्यू वेज सॅलरी नंतर कसे असेल सॅलरी स्ट्रक्चर ?
तुमच्या एकूण CTC पैकी रु. 1.19 लाखावर कर आकारला जाईल. म्हणजे CTC चा 6.6 टक्के कर.
टेक होम सॅलरी – रु 1.06 लाख, CTC च्या 70.4 टक्के.
सेवानिवृत्ती बचत- 3.06 लाख रुपये, एकूण CTC च्या 17 टक्के.
नवीन संरचनेत, तुमची वार्षिक सेवानिवृत्ती बचत रु. 3.06 (CTC च्या 17%) असेल जी पूर्वी रु. 1.96 लाख (CTC चे 10.9%) होती. याचा अर्थ, नवीन संरचनेनुसार तुमची वार्षिक सेवानिवृत्ती बचत 1.10 लाख रुपयांनी वाढेल.
न्यू व्हेज कोड लागू झाल्यावर सॅलरी स्ट्रक्चर
पगार | महिना | वार्षिक |
बेसिक सॅलरी | 75,000 रुपये | 9,00,000 रुपये |
HRA | 37,500 रुपये | 4,50,000 रुपये |
स्पेशल अलाउंस | – | – |
PF कंट्रीब्यूशन | 9,000 रुपये | 1,08,000 रुपये |
NPS कंट्रीब्यूशन | 7,500 रुपये | 90,000 रुपये |
फ्यूल अँड ट्रांसपोर्ट | 10,000 रुपये | 1,20,000 रुपये |
फोन | 1,000 रुपये | 12,000 रुपये |
वर्तमानपत्रे -पुस्तके | 1,000 रुपये | 12,000 रुपये |
बोनस (वार्षिक) | 5,400 रुपये | 64,800 रुपये |
ग्रॅज्युएटी | 3,600 रुपये | 43,200 रुपये |
एकूण सॅलरी | 1,50,000 रुपये | 18,00,000 रुपये |
नवीन नियमानुसार, समजा वार्षिक मूळ वेतन 9 लाख रुपये असेल तर एचआरए 4,50,000 रुपये होईल. परंतु, तुम्हाला फक्त 2,42,400 रुपयांवर कर सूट मिळेल. म्हणजे 2,07,600 रुपयांवर कर भरावा लागेल. यापूर्वी, तुम्हाला एचआरएच्या हेडखाली मिळणाऱ्या ४५,६०० रुपयांवर कर भरावा लागत होता. नव्या वेतन रचनेत एचआरएवरील करात मोठी वाढ होणार आहे. तुम्ही वार्षिक CTC वरील कराची तुलना केल्यास, आता तुम्हाला 1.10 लाख (एकूण CTC च्या 6.1%) कर भरावा लागेल, जो नवीन संरचनेत रु. 1.19 लाख (एकूण CTC च्या 6.6%) असेल.
तुम्हाला इच्छा असल्यास, तुम्ही तुमचा टेक होम पगार आता आहे तसाच ठेवू शकता, परंतु त्यामुळे कर वाढेल. तथापि, वार्षिक निवृत्ती बचतही वाढेल.
तर मग तुमचे सॅलरी स्ट्रक्चर असं असू शकतं…
पगार | महिना | वार्षिक |
बेसिक सॅलरी | 75,000 रुपये | 9,00,000 रुपये |
HRA | 37,500 रुपये | 4,50,000 रुपये |
स्पेशल अलाउंस | 2,400 रुपये | 28,800 रुपये |
PF कंट्रीब्यूशन | 9,000 रुपये | 1,08,000 रुपये |
NPS कंट्रीब्यूशन | – | – |
फ्यूल एंड ट्रांसपोर्ट | 16,000 रुपये | 1,92,000 रुपये |
फोन | 2,000 रुपये | 24,000 रुपये |
वर्तमानपत्रे -पुस्तके | 1,500 रुपये | 18,000 रुपये |
बोनस (वार्षिक) | 3,000 रुपये | 36,000 रुपये |
ग्रॅज्युएटी | 3,600 रुपये | 43,200 रुपये |
एकूण सॅलरी | 1,50,000 | 18,00,000 रुपए |
सध्याच्या पगाराच्या रचनेत, टेक होम पगार 1.14 लाख रुपये आहे, परंतु नवीन रचनेत टेक होम पगार 1.08 लाख रुपये होईल. जर तुम्ही NPS चा पर्याय सोडला तर तो 1.15 लाख रुपये होईल. पहिल्या रचनेत, रु. 1.10 लाख (CTC चे 6.14%) कर भरावा लागेल.नवीन संरचनेत, हे रु. 1.19 लाख (CTC च्या 6.6%) पर्यंत वाढेल.
तुम्ही NPS सोडले तरी त्यावर कोणताही कर परिणाम होणार नाही आणि तुम्हाला फक्त 1.19 लाख रुपये भरावे लागतील. सेवानिवृत्ती बचत रुपये 1.96 लाख (CTC च्या 10.9%), जी नवीन संरचनेत 3.06 लाख (CTC च्या 17%) पर्यंत वाढेल. NPS सोडल्यावर, सेवानिवृत्ती बचत रु. 1.96 लाख ऐवजी रु. 2.16 लाख (CTC चे 12%) होईल. या प्रकरणात तुमचा टेक होम पगार वाढेल.