Take a fresh look at your lifestyle.

7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी ! DA, TA नंतर आता डिसेंबरपर्यंत मिळणार आणखी एक गुड न्यूज ; पहा डिटेल्स

0

गेल्या महिन्यापासूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरू झाली आहे. 28 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने 4% महागाई भत्ता (DA) मंजूर केला होता. यानंतर त्यांच्या प्रवास भत्त्यातही (TA) वाढ जाहीर करण्यात आली. पण, कर्मचाऱ्यांचा हे दोन मोठे गिफ्ट तर मिळालेच परंतु अजूनही पुढील दोन महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीही चांगले जाणार आहेत.

तस पाहता आता कर्मचाऱ्यांचे वार्षिक मूल्यमापन (Annual Evaluation) होणार आहे आणि पदोन्नतीही (Promotion) व्हायची आहे. स्व-मूल्यांकन पूर्ण झालं आहे. डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना याचा लाभ देखील मिळालेला असेल. यानंतर जानेवारीत महागाई भत्ताही (DA) जाहीर केला जाणार आहे.

डिसेंबरपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होऊ शकते. प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. या विविध केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या DA थकबाकीवरही चर्चा होऊ शकते.

महागाई भत्त्यासह इतर भत्तेही वाढले …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै 2022 च्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबरोबरच इतर भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. सरकारने प्रवास भत्त्यातवाढ केली आहे. आता केंद्रीय कर्मचारीही तेजस एक्स्प्रेस ट्रेनने ऑफिशियल टूर प्लॅनचे नियोजन करू शकतात. आतापर्यंत राजधानी एक्स्प्रेस किंवा दुरांतोने प्रवास करण्याचा भत्ता यामध्ये समाविष्ट होता. याशिवाय शहर भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. पगारवाढीचा थेट फायदा निवृत्ती निधीलाही होणार आहे. वाढत्या महागाई भत्त्याचा परिणाम भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीवरही (Gratuity) दिसून येईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वर्षाचा शेवट खूप चांगला जाणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबर महिना महत्त्वाचा आहे. कारण, त्यांचे प्रमोशन बाकी आहे. जुलैपर्यंत सर्व विभागांमध्ये स्वयंमूल्यांकन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांचा आढावाही पूर्ण झाला आहे. आता फाईल पास होणे बाकी आहे. पदोन्नती होताच कर्मचाऱ्यांच्या पगारात (CG Employees Salary Hike) मोठी वाढ होणार आहे. डिसेंबरपर्यंत मूल्यांकन पूर्ण होईल. पदोन्नती आणि पगारवाढ 7व्या वेतन आयोगाअंतर्गत ((7th Pay Commission) ) केली जाईल.

18 महिन्यांची DA ची थकबाकी मिळेल ?

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांची मागणी आहे की, त्यांना जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत DA ची थकबाकीही देण्यात यावी. मात्र, केंद्र सरकारशी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, पेन्शनर्स संघटनेने याप्रकरणी पंतप्रधान मोदींकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. आता नोव्हेंबरमध्येही कॅबिनेट सचिवांसोबत बैठक होणार आहे. यामध्ये थकबाकी भरण्याबाबत सहमती होऊ शकेल, अशी आशा कर्मचारी संघटनेने व्यक्त केली आहे.

महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढला

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या जुलै 2022 च्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्यात आली आहे. त्याचे पेमेंटही सुरू झालं आहे. वर्षातून दोनदा महागाई भत्त्याचा आढावा घेतला जातो. पहिला जानेवारी आणि दुसरा जुलै. अलीकडेच महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचा DA 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबरच्या पगारासह केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव DA चा लाभ मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.