शेतीशिवार टीम, 26 जून 2022 : ओडिसा मध्ये असलेली नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) ला TATA समूहाच्या कंपनीकडे सोपवण्याचे काम जुलैच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या संबंधित एका एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
Tata Steel Long Products (TSLP), टाटा स्टीलच्या युनिटने या वर्षी जानेवारीमध्ये NINL मधील 12,100 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्याने 93.71% भागभांडवल विकत घेण्याची बोली जिंकली होती. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (Jindal Steel), नलवा स्टील अँड पॉवर लिमिटेड (Nalwa Steel) आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड (JSW Steelsteel) यां बलाढ्य कंपन्यांना मागे टाकून कंपनीने हे यश मिळवलं आहे.
व्यवहार अंतिम टप्प्यात :-
नीलाचल इस्पात निगम लिमिटेडचा (NINL) ला TATA समूहाला ताबा देण्यासाठी व्यवहार अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत हे हस्तांतरण झालं पाहिजे, असं एका अधिकाऱ्याने PTI ला सांगितलं. कंपनीमध्ये सरकारची कोणतीही भागीदारी नसल्यामुळे, विक्रीची रक्कम केंद्र सरकारी तिजोरीत जमा होणार नाही. आणि त्याऐवजी ओडिशा सरकारच्या चार CPSE आणि दोन PSU मध्ये जाणार आहे.
कंपनीवर प्रचंड कर्ज :-
नीलाचल इस्पात निगम लिमिटेडचा (NINL) कलिंगनगर, ओडिशा येथे 1.1 मेट्रिक टन क्षमतेचा एकात्मिक स्टील प्लांट आहे. ही सरकारी कंपनीही मोठ्या तोट्यात चालली असून 30 मार्च 2022 पासून हा प्लांट बंद आहे.
31 मार्च 2021 पर्यंत कंपनीवर 6,600 कोटी रुपयांची कर्जे आणि दायित्वे आहेत, ज्यात प्रवर्तकांचे 4,116 कोटी रुपये, बँकांचे 1,741 कोटी रुपये, इतर कर्जदार आणि कर्मचाऱ्यांची मोठी देणी यांचा समावेश आहे.