या Car ने मायलेजच्या बाबतीत आत्तापर्यंतचे मोडले सर्व रेकॉर्ड ; अल्टोलाही टाकलं मागे, पहा फीचर्स अन् किंमत…

0

शेतीशिवार टीम, 27 जून 2022 : भारतात स्वस्त Alto पेक्षा जास्त मायलेज देणारी हॅचबॅक कार आहे. हॅचबॅक सेगमेंटमध्ये फ्यूल एफिशिएंट वाहनांच्या बाबतीत मारुतीचे मार्केटमध्ये वर्चस्व राहिलं आहे. सध्या मारुती सुझुकी भारतात सर्वाधिक हॅचबॅक वाहनांची विक्री करते. कंपनीने नेक्स्ट जनरेशन सेलेरियो (Celerio) जानेवारीमध्ये लॉन्च केली होती. त्यानंतर ती अल्टोला मागे टाकून सर्वाधिक मायलेज देणारी हॅचबॅक बनली आहे.

मारुती सेलेरियो (Celerio) किंमत :-

मारुती सेलेरियोचे 8 व्हेरियंट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ज्याची किंमत 525000 ते 700000 रुपये (Ex-showroom) दरम्यान आहे. त्याच्या LXI 1L ISS 5MT व्हेरियंटची किंमत 525000 रुपये आहे, VXI 1L ISS 5MT ची किंमत 574000 रुपये आहे, ZXI 1L ISS 5MT ची किंमत आहे 594000 रुपये आणि ZXI+ 1L ISS AGS च्या टॉप व्हेरिएंटची किंमत 70000 रुपये आहे.

मारुती सेलेरियोचे (Celerio) मायलेज :-

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) एक लिटर पेट्रोलमध्ये 26.68 Km मायलेज देतं आणि CNG व्हेरियंट 35.60 Km मायलेज देतं. म्हणजेच त्याच्या CNG व्हेरियंटचे मायलेजही सर्वाधिक आहे.

मारुती सेलेरियो इंजिन :-

नवीन Celerio नवीन K10C DualJet 1.0-लीटर तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह येतं. हे इंजिन 66HP पॉवर आणि 89 टॉर्क जनरेट करते. हे सध्याच्या मॉडेलपेक्षा 2 hp पॉवर आणि 1Nm टॉर्क कमी जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन त्याच्या LXI व्हेरियंटमध्ये मिळणार नाही.

सेलेरिओला नवीन रेडियन्ट फ्रंट ग्रिल, शार्प हेडलाइट युनिट आणि फॉग लाईट केसिंगसह 3D स्कल्प्टेड एक्सट्रॅरिअर प्रोफाइल मिळेल. ब्लॅक ॲक्सेंटसह फ्रंट बंपर देखील नवीन आहे. त्यातील काही घटक एस-प्रेसोमधूनही घेतले आहेत. आउटगोइंग मॉडेलच्या तुलनेत कारची साइड प्रोफाइल देखील पूर्णपणे भिन्न दिसते. यात नवीन डिझाइनसह 15-इंच अलॉय व्हील आहेत. मागील बाजूस, तुम्हाला बॉडी कलरचे मागील बंपर, फ्लुइड लुकिंग टेललाइट्स आणि कर्व्ही टेलगेट मिळतात.

मारुती Celerio चे सेफ्टी फीचर्स :- 

या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड असिस्ट (First-in segment) सह एकूण 12 सुरक्षा फीचर्स मिळतील. कंपनीचा दावा आहे की, नवीन Celerio फ्रंटल-ऑफसेट, साइड क्रॅश आणि पादचारी सुरक्षा यासारख्या सर्व भारतीय सुरक्षा नियमांचे पालन करते. सॉलिड फायर रेड आणि स्पीडी ब्लू यासह आर्क्टिक व्हाईट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे, कॅफीन ब्राउन, रेड आणि ब्लू या सहा कलर ऑप्शनमध्ये ते उपलब्ध आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.