शेतीशिवार टीम, 14 जून 2022 : NREGA Job Card Benefits : NREGA ज्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) म्हणून ओळखलं जातं, ही योजना केंद्र सरकारने 2005 मध्ये देशातील ग्रामीण कुटुंबांना रोजगार देण्यासाठी सुरू केली होती, ज्या अंतर्गत अर्जदार कामगार आहेत. या योजनेअंतर्गत 100 दिवसांची रोजगार हमी दिली जाते, यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत योजनेत नोंदणीकृत स्थलांतरित कामगार आणि बांधकाम कामगारांना नरेगा जॉबकार्ड दिले जातात. NREGA जॉब कार्ड (NREGA Job Card Benefits) द्वारे कामगारांना राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांमध्ये सहज रोजगार मिळतो.
जर तुम्ही देखील मजूर असाल आणि तुम्ही NREGA जॉब कार्डसाठी अद्याप देखील अर्ज केला नसेल, तर तुम्ही त्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाइट nrega.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकाल. जॉब कार्डमुळे कामगारांना काय फायदे मिळतील ? जॉब कार्डसाठी अर्ज कसा कराल ? याबद्दल माहिती आपण या शेतीशिवारच्या लेखाद्वारे जाणून घेऊया….
लवकर बनवा NREGA जॉब कार्ड मिळतील फायदेच फायदे…
NREGA जॉब कार्ड हे देशातील सर्व कामगारांना दिले जाणारे ओळखपत्र आहे, ज्याद्वारे कामगारांना त्यांच्या स्वतःच्या गावातच सहज रोजगार मिळू शकेल. यामुळे देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कामगार ज्यांना रोजगाराच्या शोधात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावं लागते, त्यांना त्यांच्याच राज्याच्या 5 किमीच्या परिघात कामगार योजनांमध्ये रोजगार मिळू शकणार आहे. जॉबकार्ड अंतर्गत, योजनांमध्ये कामगारांना रोजंदारीवर मजुरी दिली जाते, या योजनेत पूर्वी कामगारांना 182 रुपये वेतन दिले जात होते, ते आता 202 रुपये करण्यात आलं आहे. या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर नागरिकांनी नरेगा जॉब कार्ड ऑनलाइन बनवण्यासाठी केलेल्या अर्जांची स्थिती देखील नागरिकांना तपासता येणार आहे.
NREGA जॉब कार्डच्या पात्रतेच्या अटी :-
NREGA लेबर कार्ड बनवण्यासाठी कामगार हा भारताचा रहिवासी असावा.
या योजनेंतर्गत देशातील असंघटित क्षेत्रातील स्थलांतरित कामगार, वर्षातून 100 दिवस मजूर म्हणून काम केलेले बांधकाम कामगार लेबर कार्डसाठी अर्ज करू शकतात.
नरेगा जॉब कार्ड मिळविण्यासाठी, अर्जदार कामगाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
अर्जासाठी सर्व महत्त्वाची कागदपत्रे कामगाराकडे असावीत.
NREGA जॉबकार्डसाठी अर्ज करणार्या कामगारांनाच जॉबकार्ड दिले जातील.
NREGA जॉब कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे :-
अर्जदार कामगाराचे आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
शिधापत्रिका
उत्पन्न प्रमाणपत्र
वय प्रमाणपत्र
बँक पासबुक
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
मोबाईल नंबर
NREGA जॉब कार्डसाठी अर्ज कसा करावा :-
जॉब कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार कामगाराने योजनेच्या अधिकृत वेबसाइट nrega.nic.in ला भेट द्यावी.
आता होम पेजवर तुम्हाला https://mnregaweb2.nic.in/ ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
यानंतर डेटा एंट्री लॉगिन फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरावी लागेल.
उदाहरणार्थ, आर्थिक वर्ष, जिल्हा, ब्लॉक, ग्रामपंचायत, टाकून लॉग इन करा.
आता नवीन पेजमध्ये तुम्ही Registration and Job Card च्या ऑप्शनवर क्लिक करा आणि BPL data क्लिक करा.
आता अर्ज तुमच्या समोर येईल, ज्यामध्ये तुम्हाला प्रमुखाचे नाव, नोंदणीची तारीख इत्यादी टाकावे लागेल.
सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करावा लागेल.
त्यानंतर जॉब कार्डसाठी तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल…
ऑफलाईन :-
मनरेगा जॉब कार्ड मिळविण्यासाठी, कामगारांनी प्रथम त्यांच्या जवळच्या ग्राम पंचायतीशी संपर्क साधावा. पंचायतीकडून नरेगा जॉब कार्डसाठी अर्ज मिळवा…